ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

शिंदे पवारांच्या मदतीने फडणवीसांना आव्हान देणार:उद्धव ठाकरेही भाजपसोबत जाणार, लक्ष्मण हाके यांच्या दाव्याने राजकीय खळबळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


2029 च्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे शरद पवारांशी संधान साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपला आव्हान देतील. तसेच उद्धव ठाकरेही पवारांची साथ सोडून भाजपसोबत जातील, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रविवारी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. लक्ष्मण हाके यांनी रविवारी सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी उपरोक्त दावा केला. ते म्हणाले, आगामी निवडणुकांत म्हणजे 2029 मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी व अजित पवारांची राष्ट्रवादी हे 3 पक्ष एका बाजूला असतील. तर भाजप व उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येतील. यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल. ह्याची सुरुवात नुकत्याच झालेल्या पंचायत राज निवडणुकीत झाली. या निवडणुकीत ज्या पद्धतीने आघाड्या झाल्या ते पाहता आता नवीन ध्रुवीकरणाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट होते. शिंदे गटाकडून वारंवार फडणवीस, भाजपवर टीका शिंदे गटाचे मंत्री व नेते अलीकडच्या काळात वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपला अडचणीत आणणारी विधाने करत आहेत. महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने भाजपला विरोध करण्याची भूमिका घेतली. अनेक ठिकाणी शिंदे गट व दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली पोकळी एकनाथ शिंदे भरून काढण्याचा जोरदार प्रयत्न करतील. ज्या पद्धतीने त्यांनी पंचायतराज निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपला विरोध केला. ते पाहता या तीन पक्षांची आघाडी पुढील निवडणुकीत दिसेल यात शंका नाही, असे ते म्हणाले. राज ठाकरेंना जनाधार उरला नाही लक्ष्मण हाके यांनी यावेळी राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेला कोणताही जनाधार उरला नसल्याचाही दावा केला. राज ठाकरे यांच्या मनसेला आता कोणताही जनाधार उरला नाही. राज यांनी आतापर्यंत अनेकदा भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे त्यांना आणखी काही वर्षे तयारी करण्याची गरज आहे. पण भाजपपासून दूर गेलेले उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भाजपसोबत आल्याचे चित्र 2029 च्या निवडणुकीत दिसेल हे स्पष्ट आहे, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून भाजपसोबतच्या युतीशी फारकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यात उद्धव स्वतः मुख्यमंत्री झाले होते. पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 2022 मध्ये मोठे बंड होऊन शिवसेना फुटली. सध्या शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदेंच्या ताब्यात आहे. शिंदे स्वतः भाजपसोबत सत्तेत आहेत. पण आता लक्ष्मण हाके यांनी शिंदे भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर