ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

नरसाळा येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहला झाली सुरुवात.

91 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ह.भ.प.भागावतचार्य वानीभूषण श्रीकृष्ण कुमार पांडे महाराज यांच्या मधुर वाणीतुन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्य वृदावन धाम श्री हनुमान मंदिराच्या प्रणांगणात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ् सप्ताहला दिनांक 11/04/2022 ला सुरुवात झाली असून दिनांक 18/04 2022 ला कथेची अमाप्ती होणार आहेत.
नरसाळा येथील हनुमान देवस्थान मंडळाचे अध्यक्ष यादवराव पांडे यांच्या प्रेरणेतून आज 26 वर्षा पासून नरसाळा येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन केल्या जात आहेत.

त्याच प्रमाणे गेली दोन वर्ष कोरोना मुळे श्रीमद भागवत कठेचा आनंद परिसरातील भाविकांना घेता आला नाहीत.परंतु या वर्षी ह.भ.प.भगवताचार्य वणीभूषण श्रीकृष्ण कुमार पांडे महाराज बनारस कशी उ.प्र. याच्या मधुर वाणीतून कथा पठाण करण्याकरिता परिसरातील व दूरदूरून भाविक येताना दिसत आहेत.महाराजाच्या साथेला तबला वादक ह.भ.प.पवन श्रीमद (शिरसगाव कसब) ऑरगन् वादक व गायक   ह.भ.प.राजेश महाराज ठाकरे (कीर्तनकार),चौपदार ह.भ.प.रमेश बोरखडे,दृष्य देखावा (झाकी व भारूड) ह.भ.प.माणिकराव नेवारे (अमरावती),ह.भ.प.


भीमराव राठोड (यवतमाळ)हे आहेत.या भागवत सप्ताहत सोमवार दिनांक 11/04/22 रोजी संप्रदायिक वारकरी भजन मंडळ नरसाळा यांचे भजन,मंगळवार दिनांक 12/04/22 रोजी श्री राधे महीला भजन मंडळ नरसाळा यांचे भजन,बुधवार दिनांक 13/04/22 रोजी गुरुसेवा भजन मंडळ नरसाळा यांचे भजन,गुरुवार दिनांक 14/04/22 रोजी संगीत वारकरी भजन मंडळ नरसाळा यांचे भजन,शुक्रवार दिनांक 15/04/22 रोजी महिला भजन मंडळ नरसाळा यांचे भजन

शनिवार दिनांक 16/04/22 रोजि तुळशीदास रामायणातील सुंदरकांड पाठ नरसाळा यांचे राहील.रविवार दिनांक 17/04/22 रोजी ग्रंथपूजन व मिरवणूक राहील .सोमवार दिनांक 18/04/22 रोजी कल्याचे कीर्तन भगवताचार्य ह.भ.प.देवदत्त आढाव महाराज तीर्थक्षेत्र कळंब यांचे राहील.तरी या पावन उत्साहाला उपस्थित राहून ज्ञानयज्ञा  चा लाभ घ्यावा .या कार्यक्रमाला श्री हनुमान देवस्थान मंडळ व समस्त गावकरी नरसाळा यांचे मोलाचे योगदान आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर