ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मुंबईत धावत्या इलेक्ट्रिक बेस्ट बसला भीषण आग:पश्चिम द्रुतगती महामार्गावरील घटना; प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’च्या ताफ्यातील एका इलेक्ट्रिक बसला कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. कांदिवलीतील साईधाम मंदिर परिसरात ही दुर्घटना घडली असून, सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टची 289 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस दामू नगर परिसरातून प्रवाशांना घेऊन बोरिवलीच्या दिशेने निघाली होती. बस अंधेरीकडून बोरिवलीकडे जात असताना पश्चिम द्रुतगती महामार्गावर अचानक बसमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. ही घटना कांदिवली येथील साई धाम मंदिराजवळ घडली. ज्यावेळी आग लागली, त्यावेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. आगीची चाहूल लागताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली, मात्र चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना तातडीने बसबाहेर काढण्यात आले. संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी ही आग लागल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आगीमुळे कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि जोगेश्वरी दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले, तरी ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर तांत्रिक कारणामुळे, याचा तपास अग्निशमन दलाचे जवान आणि समता नगर पोलिस करत आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र यामुळे इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर