ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

औंढा नागनाथ मंदिर परिसरात रथोत्सवाच्या वेळी महिलांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी:भाविकांनीच मध्यस्थी करून वाद सोडवला, पोलिसांनी मंदिरातील फुटेज मागवले

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


औंढा नागनाथ मंदिर परिसरात रथोत्सवाच्यावेळी महिलांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणात आता औंढा नागनाथ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याच्या सूचना औंढा नागनाथ संस्थानला शुक्रवारी ता. २० दिल्या आहेत. जागेच्या कारणावरून हाणामारी झाली असावी अशी शक्यता संस्थान प्रशासनाने व्यक्त केली आहे. औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यात्रा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या रथोत्सवाच्या वेळी बुधवारी ता. १८ दुपारपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. मराठवाड्यासह बाहेर राज्यातील भाविक देखील यावेळी हजर होते. मंदिराच्या परिसरात सुमारे १ लाखापेक्षा अधिक भाविक आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. रथोत्सवाच्या वेळी झालेली गर्दी पाहता पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नव्हती. दरम्यान, रथोत्सव सुरु होताच मंदिराच्या परिसरात जमा झालेल्या दोन महिलांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारीला सुरुवात झाली. एकमेकांचे केस ओढून मारहाणीपर्यंत प्रकरण गेले. यामध्ये इतर दोन ते तीन महिलांनीही मारहाणीत सहभाग घेतला तर एका तरुणाने दुसऱ्या एका तरुणालाही मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या या मारहाणीच्या प्रकारामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र काही भाविकांनीच मध्यस्थी करून वाद सोडवला. हाणामारीचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल दरम्यान, मंदिर परिसरातील हाणामारीचे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये हाणामारी होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात आता औंढा नागनाथ पोलिसांनी शुक्रवारी ता. २० तातडीने संस्थान प्रशासनाशी संपर्क साधून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या फुटेजवरून त्या महिलांची व तरुणांची ओळख पटवून कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. तर गर्दीमुळे धक्का लागणे व जागेच्या कारणावरून वाद झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वादादरम्यान एकही पोलिस कर्मचारी दिसला नाही सण आणि उत्सवाच्या काळात औंढा नागनाथ मंदिर परिसरात होत असलेली मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र या महिलांमध्ये हाणामारी होत असताना 15 ते 20 मिनिटे या परिसरात एकही पोलिस कर्मचारी दिसून आला नाही. अखेर भाविकांनीच हा वाद मिटवला. त्यामुळे पोलिसांच्या एकूणच संरक्षण विषयक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गेल्या वर्षी शिवरात्रीच्या दिवशीच भिडले होते सुरक्षा रक्षक आणि भाविक औंढा नागनाथ मंदिरात गेल्या वर्षी शिवरात्रीच्या दिवशीच अशीच एक घटना घडली होती. या ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये जोरदार वाद झाला होता. मंदिराच्या दारात गर्दी असल्याने, भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चांगला वाद झाला होता. त्याचा व्हिडिओ देखील नंतर व्हायरल झाला होता. या वादामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेले भाविक घाबरले होते. या घटनेमुळे मंदिर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा अधिक जागरूक झाली असल्याचे बोलले जात होते. मात्र, या वर्षी देखील पुन्हा हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. औंढा नागनाथ मंदिराचा अद्भुत इतिहास आणि महिमा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर हे भगवान शंकराचे आठवे आणि आद्य ज्योतिर्लिंग मानले जाते. बारा ज्योतिर्लिंगांमध्ये या मंदिराला विशेष स्थान असून ते धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नागनाथ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानाबाबत भाविकांमध्ये अशी श्रद्धा आहे की येथे दर्शन घेतल्यास सर्व प्रकारच्या विषबाधेपासून संरक्षण मिळते. महाभारत काळात पांडवांनी आपल्या 14 वर्षांच्या वनवासादरम्यान या मंदिराची उभारणी केली, अशी पौराणिक मान्यता आहे. पुढे यादव काळात, साधारण 13 व्या शतकात मंदिराची पुनर्बांधणी झाल्याचे सांगितले जाते. हेमाड स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरणपंती हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. भव्य रचना आणि बारकाईने केलेले कोरीव काम पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. या मंदिराशी संत नामदेवांची एक प्रसिद्ध आख्यायिका जोडलेली आहे. संत नामदेवांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांनी मंदिराच्या पाठीमागे बसून कीर्तन केले. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन मंदिरानेच आपले मुख त्यांच्या दिशेने फिरवले, अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे औंढा नागनाथ मंदिर श्रद्धा, इतिहास आणि भक्तीचा अद्वितीय संगम मानला जातो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर