ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मेधा कुलकर्णींकडे ‘नासकी वृत्ती’ म्हणून पाहिलं जातंय:अभिमन्यू पवार भेद करत नाहीत, वाद मेधा कुलकर्णींच्या हेकेखोर स्वभावामुळेच- रुपाली ठोंबरे

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपा खासदार मेधा कुलकर्णी या नेहमी जातीयवाद आणि धर्मभेद करत समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीत सहानुभूती घेण्याची सवय झाली असून त्या स्वतः जातीयवादात अडकल्या आहेत. त्यांनी सर्वांना एकत्रित घेऊन विकासाचे राजकारण केले पाहिजे. सध्या त्यांच्याकडे एक ‘नासकी वृत्ती’ म्हणून पाहिले जात आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. मेधा कुलकर्णी यांनी मराठा-ब्राह्मण असा वाद करू नये, आणि जर असा प्रयत्न झाला तर त्यांच्यावर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. कालच्या कार्यक्रमातील कथित वादावर बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या की, त्या कार्यक्रमात मराठा किंवा ब्राह्मण असा कोणताही वादाचा मुद्दा उपस्थित नव्हता. मेधा कुलकर्णी या प्राध्यापक असताना नगरसेविका झाल्या आणि आज खासदार आहेत तेव्हापासून त्यांना ओळखते त्यांचा स्वभाव अत्यंत हेकेखोर आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांना फक्त मागच्या रांगेत बसायला सांगितले होते, पण केवळ तेवढ्यावरून त्यांनी नाहक त्रागा केला आणि वादाला तोंड दिले. अभिमन्यू पवार हे कोणत्याही जातीमध्ये कधीच भेद करत नाहीत. शहराच्या विकासासाठी काय केले? रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, मेधा कुलकर्णी यांनी पुणे शहराच्या विकासासाठी काय केले? पुण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे यावर मेधा कुलकर्णी या पुढे का आल्या नाहीत, असा सवाल ठोंबरे यांनी केला आहे. कोथरूडमध्ये समस्या सोडवताना तुम्ही कधी दिसत नाहीत, लोकांमध्ये जाऊन त्यांचे काम करताना तुम्ही दिसत नाही. केवळ संसदेत जाऊन भाषण करण्याचे काम तुम्ही करतात. मेधा कुलकर्णी या कधीच विकासाचे राजकारण करत नाहीत. त्या जाती-जातीमध्ये आणि धर्मा-धर्मांमध्ये कशी तेढ निर्माण होईल हे त्या बघतात. भाजपने त्याचा अनुभव घेतला हे बरे झाले. त्यांना थांबवणे गरजे आहे हे राजकारणी आणि लोकांचे कर्तव्य आहे. मेधा कुलकर्णी संविधानामुळे खासदार रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, लोकप्रतिनिधींनी काम करत असताना संविधानाप्रमाणे काम केले पाहिजे. काल जो कार्यक्रम होता तो अण्णासाहेब पाटील महामंडळाचा होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह आमदार-खासदार उपस्थित होते. मेधा कुलकर्णी या संविधानामुळे खासदार झाल्या आहेत हे त्या विसरतात. पण त्या पहिल्यापासूनच धर्मा-धर्मांमध्ये वाद होतील असे कृत्य करतात. त्या मंदिर, दर्गा यावर बेकायदेशीरपणे आपले म्हणणं मांडत पोलिसांना वेठीस धरण्याचे काम करत असतात. सर्व धर्मांमध्ये ऐक्य राहिले पाहिजे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, आपल्या राज्यात आणि देशात शांतता आणि सर्व धर्मांमध्ये ऐक्य राहिले पाहिजे, असे काम गरजेचे असताना. त्यांना आता जातीचे राजकारण सुरू केले आहे. त्यांना मागे बसायला सांगितल्याने त्यांच्याकडून वाद घालण्यात आला. बरे झाले भाजपच्या लोकांमध्येच हे सर्व काही घडले असेही रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे. अभिमन्यू पवार हे कोणत्याही जातीमध्ये भेद करत नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर