ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नागपुरात हेल्मेटमध्ये निघाला नाग:हेल्मेट घालण्यासाठी हाती घेताच निघाला बाहेर, तरुणीचा जीव थोडक्यात वाचला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपुरात थंडीमुळे हेल्मेटमध्ये विषारी नाग लपून बसल्याची घटना पुढे आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी डोक्याचे हेल्मेट, पायातील चप्पल किंवा बूट, कपडे आदी कोणतीही वस्तू एकदा तपासून किंवा झटकून घ्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही घटना गत बुधवारी घडली. पण तिचा एक व्हिडिओ आज सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नागपूर शहरातील सेमिनरी हिल परिसरातील मिताली चतुर्वेदी यांच्या कुटुंबात ही घटना घडली. मिताली यांनी आपले दुचाकीवरील हेल्मेट घरात ठेवले होते. बुधवारी दुपारी 2.30 च्या सुमारास त्यांना हेल्मेटमधून सापाचा फुत्कार ऐकू आला. त्यांनी घाबरून जवळ जाऊन पाहिले असता त्यांना हेल्मेटमध्ये कोब्रा जातीचा साप लपल्याचे आढळून आले. त्यांनी ही गोष्ट तत्काळ वन्यजीव संरक्षक शुभम जी. आर. यांच्या कानावर घातली. त्यानंतर शुभम यांनी तत्काळ मिताली यांच्या घराकडे धाव घेत या कुटुंबाला हेल्मेटमध्ये लपलेल्या विषारी नागापासून वाचवले. स्थानिक संघटना वाइल्ड अॅनिमल्स अँड नेचर हेल्पिंग सोसायटीच्या तज्ज्ञांनी या सापाला पकडून सुरक्षितपणे जंगलात नेऊन त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात साप हेल्मेटच्या कपड्याच्या आत लपल्याचे दिसून येत आहे. साप अनेकदा निवारा व अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येतात. त्यातून अशा घटना घडतात, असे शुभम यांनी सांगितले.

नेमकी कशी घडली घटना? मिताली आपले हेल्मेट नेहमी आपल्या दुचाकीला अडकवून ठेवतात. पण बुधवारी त्यांनी ते हेल्मेट दुचाकीला न अडवता आपल्या घरात नेले. तिथे ते एका बाजूला ठेवले. दुपारी 2.30 च्या सुमारास त्यांना काही कामानिमित्त घराबाहेर जायचे होते. त्या त्याची तयारी करत होत्या. त्यावेळी अचानक त्यांना हेल्मेटच्या आतून फुत्कार ऐकू आला. हा आवाज ऐकूण मिताली घाबरल्या. त्यांनी त्याची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी सावधपणे हेल्मेट उलटे करून पाहिले असता त्यात एक विषारी कोब्रा जातीचा नाग असल्याचे आढळून आले. हे पाहून सर्वांची भीतीने गाळण उडाली. हेल्मेट उलटे करताच नाग सळसळत हेल्मेटच्या काळ्या कपड्याबाहेर आला. त्याने माणसांना पाहून आपला फणा काढला. हे पाहून मिताली व त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले. हेल्मेटमध्ये साप निघाल्याची बातमी काही वेळातच शहरात पसरली. अनेकांनी हा साप पाहण्यासाठी मिताली यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर ‘वाइल्ड एनिमल्स एंड नेचर हेल्पिंग सोसाइटी’ स्थानिक सदस्य शुभम यांना ही गोष्ट कळवण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या सापाची सुटका केली. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज नागांमध्ये न्यूरोटॉक्सिक विष असते. त्यांचा एकच डंख प्राणघातक ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात घराजवळ विटा व दगड साठवलेले असतील तर सापही राहू शकतात. ते लाकूड व पेंढ्याच्या ढिगाऱ्यातही शिरू शकतात. घराच्या अंगणात खूप झाडे असतील तर त्यांच्या पडलेल्या पानांच्या ढिगाऱ्यातही साप बसू शकतात. त्यामुळे सर्पमित्र हिवाळ्यात सापांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भिंतीमधील भेगा भरण्याचा सल्ला देतात. तसेच भिंती व पाईपधील जागा भरण्याचीही सूचना देतात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर