ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजितदादांचा अपघात नसून घातपात:शरद पवार गटाच्या माजी आमदाराचा दावा; प्रशासनावर केले भ्रष्टाचाराचे आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार चरण वाघमारे यांनी एका पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे करत राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने अजित पवार यांचा मृत्यू आणि जिल्ह्यातील वाळू चोरीच्या नव्या प्रकरणावर भाष्य केले आहे. चरण वाघमारे यांनी दावा केला आहे की, अजित दादांचा झालेला विमान अपघात हा केवळ अपघात नसून तो एक पूर्वनियोजित घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या माहितीनुसार, रोहित पवार यांनी गेल्या महिनाभरापासून या संदर्भात पुरावे गोळा केले आहेत. काल रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला, असा आरोप वाघमारे यांनी केला आहे. याच कारणामुळे आज बारामती पोलीस स्टेशनमध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या आणि वकिलांच्या उपस्थितीत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ​’सुपर एन्ट्री’ वाळू घोटाळा चरण वाघमारे यांनी जिल्ह्यातील वाळू चोरीच्या ‘सुपर एन्ट्री’ नावाच्या एका नवीन प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. रॉयल्टी न भरता छुप्या पद्धतीने ५ ब्रास ऐवजी १० ब्रास वाळूची वाहतूक केली जात आहे. यासाठी अधिकाऱ्यांना ‘सुपर एन्ट्री’च्या नावाखाली पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ​सरकारला इशारा राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शासन ९ लाख ३५ हजार कोटींच्या कर्जात आहे. अशा परिस्थितीत अवैध वाळू वाहतुकीमुळे कोट्यवधींचा महसूल बुडून अधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे गोपनीय तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. ​रोहित पवार यांच्या आंदोलनाला आणि अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर