ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पार्लर बंद केले म्हणून विवाहितेची आत्महत्या:’हसू झालंय माझं ग’ म्हणत उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात फलटणसारखीच घटना

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्य सावरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेने कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची भयंकर घटना सोलापूरच्या नातेपुतेत घडली आहे. या विवाहितीने फलटण येथील महिला डॉक्टरसारखेच आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल रणदिवे (22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पायलला ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी तिने क्लासही लावला होता. पण तिच्या कुटुंबीयांनी तो क्लास बंद केला. यामुळे ती व्यथित झाली होती. तिने शनिवारी सायंकाळी घरात कुणी नसल्याचे पाहून आत्महत्या केली. तत्पूर्वी, तिने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात तिने आपल्या नवऱ्यासह सासरच्या मंडळींवर कौटुंबीक छळाचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण व जखमांच्या खुणाही आढळल्या आहेत. त्यानुसार, तिच्या वडिलांनी तिच्या पतीसह सासू, सासरे व दिराविरोधात शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी पायलचा पती शशिकांत रणदिवे व सासू-सासऱ्यांना अटक केली आहे. तर फरार दिराचा शोध घेतला जात आहे. पोलिस अटकेतील आरोपींची कसून चौकशी करत आहेत. पायलने मृत्यूपूर्वी काय लिहिले होते हातावर? पायलने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर एक मजकूर लिहिला होता. त्यात सासरच्या मंडळींनी आपला कसा छळ केला हे विस्तृतपणे लिहिले आहे. ती म्हणते, हसू झालंय माझं. माझं पार्लर बंद केले. जीव होता तो माझा. स्वप्न होतं ग. आजपर्यंत शांत बसले, पण आता नाही. चांगल्या आई-बापाची लेक आहे म्हणून निघूनही गेले नाही. माझ्यामुळे त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते. सॉरी. फलटणमध्ये महिला डॉक्टरने केली होती आत्महत्या सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांनीही आपल्या हातावर असाच मजकूर लिहून आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली होती. हे प्रकरण राज्यभर गाजले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर