ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

आखाती देशांत मराठी नागरीक अडकले:मुख्यमंत्री फडणवीस विविध यंत्रणांच्या संपर्कात; एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांचेही विशेष प्रयत्न

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्धामुळे आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकार सक्रिय झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी विविध यंत्रणांच्या संपर्कात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी आपल्या पातळीवर विशेष प्रयत्न सुरू केलेत. आखातात इराण विरुद्ध अमेरिका इस्त्रायल युद्धाचा भडका उडाला आहे. यामुळे भारताचे हजारो नागरीक आखातात अडकून पडले आहेत. या नागरिकांनी सरकारकडे मदतीची याचना केली आहे. त्यानुसार, सरकार त्यांना मायदेशी आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ते या प्रकरणी विविध यंत्रणांशी सातत्याने संवाद साधत आहेत. त्यांनी या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे. मदतीची गरज असलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने +97150 365 4357 हा विशेष व्हॉट्सएप क्रमांकही जारी केला आहे. गरजू नागरिकांना या क्रमांकावर संवाद साधताना येईल. काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने या प्रकरणी म्हटले आहे की, आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून, ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत.राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357 एकनाथ शिंदेंकडून विशेष विमानाची सुरक्षा दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुबईसह यूएईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी तातडीने पाऊले उचलली आहेत. त्यांनी या प्रकरणी तिथे अडकलेल्या नागरिकांशी व्यक्तिशः संवाद साधून त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली. त्यानुसार, स्टार एअरची दोन विशेष विमाने आज दुपारी फुजैरा एअरपोर्टवरून उड्डाण घेणार आहेत. VTGSO – हे विमान दुपारी 3.30 वाजता, तर VT GSH – सायंकाळी 4.30 वाजता टेकऑफ घेणार आहेत. या दोन्ही विमानांमधून एकूण 164 प्रवाशी आज सायंकाळी मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे 84 विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील नागरिकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता. तुम्ही सर्वजण सुरक्षित आहात. काळजी करू नका. राज्य सरकार व मी स्वतः तुमच्या पाठिशी ठाम उभा आहेत. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असा शब्द त्यांनी या प्रकरणी या पीडित नागरिकांना दिला होता. एकनाथ शिंदेंही या प्रकरणी शासकीय यंत्रणांच्या संपर्कात आहेत. DCM सुनेत्रा पवारांनीही जारी केला हेल्पलाईन क्रमांक उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही आखातात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुटकेसाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी या प्रकरणी एक विशेष व्हॉट्स हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, आखाती प्रदेशातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची सुरक्षितता ही प्राधान्यक्रमाने राज्य सरकारसाठी सर्वोतोपरी आहे. संबंधित यंत्रणांमार्फत सर्व नागरिकांशी सातत्याने संपर्क साधला जात असून, त्यांना आवश्यक ती मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दुबईस्थित इंडियन पीपल्स फोरमच्या सहकार्याने मदत व समन्वयासाठी महाराष्ट्र सरकारमार्फत एक विशेष व्हॉट्सॲप हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांना तातडीची मदत, माहिती किंवा मार्गदर्शन आवश्यक आहे, त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आहे. व्हॉट्सॲप हेल्पलाईन : +97150 365 4357 आपल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता आणि सुखरूप परतावा सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर