ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दुचाकीस्वाराकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण:दुचाकीवर कारवाई करण्याचे कारण; हिंगोलीतील संतापजनक घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली शहरात महात्मा गांधी चौक भागात दुचाकी वाहनावर कारवाई करण्याच्या कारणावरून वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दुचाकी चालका विरुध्द शनिवारी ता. ३१ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हिंगोली शहरातील वाहतुक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. वाहतूक शाखेचे निरीक्षक शरद मरे यांनी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक चौकात वाहतूक शाखेचे कर्मचारी नियुक्त केले असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या शिवाय विना नंबर प्लेट, वाहन चालविण्याचा परवाना नसणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. दरम्यान, वाहतुक शाखेेचे कर्मचारी शशीकांत भिसे हे शनिवारी ता. ३१ सायंकाळी सहा वाजता शहरातील महात्मा गांधी चौकात कर्तव्यावर हजर होते. यावेळी एका विना क्रमांकाच्या दुचाकी वाहनावर असलेला शेख अतीक हा येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ करीत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिस कर्मचारी भिसे यांनी त्यास समजाविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वाहनावर नंबरप्लेट नसल्यामुळे त्यांनी मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरवात केली. या प्रकारामुळे संतापलेल्या शेख अतीक याने पोलिस कर्मचारी भिसे यांना शिवीगाळ करम्यास सुरवात केली. तु माझ्यावर कारवाई करतो का असे म्हणत त्यांची कॉलर पकडून मारहाण केली. त्या ठिकाणी असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी प्रकरण सोडविणे अन शेख अतीक यास ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी भिसे यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख अतीक याच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर