ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वाटाण्याच्या अक्षदा!:केंद्रीय अर्थसंकल्पावरून अंबादास दानवेंचा घणाघात, म्हणाले- सबसिडीत कपात करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी स्वागत केले आहे. तर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे. या बजेटला वाटाण्याच्या अक्षदा असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत संपूर्ण अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी शेती, ग्रामीण विकास, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य तसेच महागाई आणि टॅक्स अशा सर्वच मुद्यांवर भाष्य करत टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी शेती आणि ग्रामीण विकास या विषयावर टीका करताना म्हटले की, देशाची 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असताना, एकूण बजेटमधील कृषी क्षेत्राचा वाटा गेल्या काही वर्षात 3.5 टक्के वरून 2.5 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. खतांवरील सबसिडीत 20 हजार कोटींची कपात करून सरकारने शेतकाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हेच का तुमचे शेतकरी प्रेम? असा खोचक सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. बेरोजगारीचा भयावह आकडा पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, देशात बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांच्या पार गेला आहे, पण बजेटमध्ये नवीन रोजगारासाठी ठोस तरतूद शून्य! गेल्या वर्षीच्या तुलनेत मनरेगा (MGNREGA) निधीत वाढ करण्याऐवजी कपात करण्यात आली आहे. तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी केवळ स्किलिंगच्या नावाखाली आकड्यांचा खेळ सुरू आहे. शिक्षण आणि आरोग्य (जीडीपीची टक्केवारी) ​विकसित भारताच्या गप्पा मारताना शिक्षण क्षेत्राला जीडीपीच्या 6 टक्के निधी मिळणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात तो 3 टक्केच्या आतच रेंगाळतोय. आरोग्यासाठीची तरतूद केवळ 2.1 टक्के आहे. सामान्यांच्या जीवाशी खेळून कोणत्या पायाभूत सुविधा उभारताय? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. महागाई आणि टॅक्सचा बोजा ​पेट्रोल-डिझेलवरील करातून सरकारने लाखो कोटी कमावले, पण मध्यमवर्गीयांना टॅक्स स्लॅबमध्ये दिलेली सवलत केवळ 5-10 हजार रुपयांची आहे. महागाईचा दर 5.5 टक्के असताना ही सवलत म्हणजे जनतेची थट्टा असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. कर्ज आणि व्याज (देशाची आर्थिक स्थिती) आजच्या बजेटनुसार, सरकार आपल्या एकूण उत्पन्नातील 20 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा केवळ कर्जाचे व्याज भरण्यासाठी खर्च करत आहे. कर्जाचा डोंगर वाढत असताना ‘विकास’ फक्त कागदावरच दिसतोय. सर्वसामान्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आणि मित्रांचे खिसे गरम! अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर