ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला:सरकारी दावे म्हणजे केवळ बनवाबनवी, उद्योगांसाठी अजूनही मोजावी लागते घूस- विजय वडेट्टीवार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून, सरकारी दावे केवळ ‘बनवाबनवी’ आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, उद्योगांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी आणि ठराविक वेळेत मिळतील, अशी कोणतीही प्रभावी योजना अद्याप जमिनीवर उतरलेली नाही. आजही उद्योगांना जमिनी मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते आणि उघडपणे ‘घूस’ द्यावी लागते, हीच वस्तुस्थिती आहे. मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष विजय वडेट्टीवार म्हणाले की, पायाभूत सुविधांवरील खर्चाच्या नावाखाली मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. पायाभूत सुविधा मजबूत झाल्याच पाहिजेत, पण त्या नादात शेती आणि रोजगार निर्मिती या विषयांकडे दुर्लक्ष होता कामा नये. इराण युद्धासारख्या जागतिक संकटांमुळे डिझेल-पेट्रोलच्या किमती वाढतील, अशा वेळी सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. ही आकडेवारीची बनवाबनवी विजय वडेट्टीवार म्हणाले की,डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य रोज 60 ते 70 पैशांनी घसरत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. याचा मोठा फटका शेती उत्पादनावर आणि आयात-निर्यातीवर होईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना वडेट्टीवार म्हणाले, अहवालात महाराष्ट्र प्रगत असल्याचे दाखवण्यासाठी वरच्या क्रमांकावर असलेल्या राज्यांची नावे जाणीवपूर्वक लपवण्यात आली आहेत. ही केवळ आकडेवारीची बनवाबनवी आहे. दरडोई उत्पन्न वाढीसाठी सरकारच्या काय उपाययोजना विजय वडेट्टीवार म्हणाले की, शहरी आणि ग्रामीण भागातील वाढत्या दरीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, राज्यातील केवळ 4-5 जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न 3 लाखांच्या वर आहे, तर निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचे उत्पन्न 2 लाखांच्या खाली आहे. ही दरी कमी करण्यासाठी सरकारकडे कोणताही आराखडा नाही. तसेच, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेतही सरकार केवळ दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, यावर ते सविस्तर माहिती घेणार असल्याचेही स्पष्ट केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर