ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

दिंद्रुडला हमालांचे कामबंद आंदोलन आश्वासनानंतर स्थगित:थकीत मजुरी द्यावी, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची शासकीय गोदामातील हमालांची मागणी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील शासकीय गोदामातील हमाल कामगारांनी कामबंद आंदोलन मंगळवारपासून (२३ जून) सुरू केले आहे. यामुळे गोदामांतर्गत स्वस्तधान्य दुकानांना स्वस्त धान्याचे होणारे वितरण ठप्प झाले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुर्ते स्थगित करण्यात आले आहे. गोदामात आलेल्या धान्याच्या पोत्यांची उठाठेव करण्याची कष्टप्रत काम हमाल करतात. परंतु गेल्या पाच महिन्यांपासूनची त्यांची मजुरी सबंधित यंत्रणेने दिली नाही. यामुळे हमालांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. शाळा सुरु झाल्या असुन मुलांचे प्रवेश,शैक्षणिक साहित्याची खरेदी त्याच प्रमाणे घरखर्चासाठी हमालांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे केलेल्या कामाचा मोबदला प्रशासनाकडे मागून हतबल झालेल्या हमालांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. दरम्यान हमालांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण करुन थकलेली मजुरी द्यावी, असे हमाल कामगारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हमालांनी आंदोलन तात्पुर्ते स्थगित केले. या मागण्यांकडे वेधले लक्ष मजुरीचे पैसे तातडीने द्यावेत, शिवाय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१२ पासूनच्या थकीत महागाई निर्देशांक तातडीने पाठवणे, थेट वाहतूक धोरणात त्या-त्या ठिकाणच्या गोदामातील नोंद असलेल्या हमालांकडूनच काम करून घेण्याचे बंधन वाहतूक कंत्राटदारावर घालण्यात यावे. थेट वाहतुकीमध्ये माथाडी मंडळाने ठरवलेल्या हमाली दरानुसार हमाली लेवी भरण्याचे बंधन वाहतूक कंत्राटदार यांच्यावर घालण्यात यावे. अशा मागण्या आहेत. या आंदोलनात दिंद्रुड येथील शासकीय गोडाऊन मधील गणेश आढाव, रमेश किचमे, आश्रुबा किचमे, सुदाम ठोंबरे, माणिक भागवत, राम पारेकर बालासाहेब हारकळ, परमेश्वर चव्हाण आदी सहभागी झाले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर