ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास-मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 864 कुटुंबांना घरांच्या चाव्या:प्रतीकात्मक मोठी चावी पाहून लाभार्थांनी विचारले- खऱ्या चाव्याही मिळणार ना?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईतील नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला महत्त्वाचा टप्पा गाठताना 864 कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नव्याने बांधलेल्या घरांची पहिली चावी 80 वर्षीय शोभा गायकवाड यांना सुपूर्द केली. प्रतीकात्मक मोठी चावी पाहून त्यांनी मुख्यमंत्र्यांना हसत विचारले की, यासोबत खऱ्या चाव्याही मिळणार का? त्यावर मुख्यमंत्र्यांनी होकार देताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उसळला. अनेक वर्षांपासून चांगल्या घराची वाट पाहणाऱ्या रहिवाशांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. बीडीडी चाळीत अनेक कुटुंबे दीर्घकाळ अतिशय लहान आणि जीर्ण घरांमध्ये राहत होती. शोभा गायकवाड यांसारख्या रहिवाशांनी 160 चौरस फुटांच्या घरात आयुष्य काढले. आता त्यांना दादरच्या नायगाव परिसरातील सुमारे 500 चौरस फुटांचे नवे घर मिळणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण 864 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या असून दशकांपासून पाहिलेले स्वप्न अखेर पूर्ण झाल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील महत्त्वाचे मुद्दे :

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर