ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

शिवतीर्थावर आज राज ठाकरेंची गर्जना:उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीनंतरचा पहिला गुढीपाडवा मेळावा; मोठी घोषणा शक्य

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार असून, यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहेत. हा मेळावा पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात असून, यातून पुढील राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या भाषणातून पक्षाची आगामी भूमिका, निवडणुकांची रणनीती आणि संघटनात्मक बदल याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्यामुळे, या युतीबाबत ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळाव्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, मैदानात मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभारण्यात आली आहे. दोन मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत, ज्यावर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. या स्क्रीनवर कोणते व्हिडिओ दाखवले जाणार याबाबतही उत्सुकता आहे. सायंकाळी सहा वाजता मेळाव्याला सुरुवात होणार असून, त्यानंतर राज ठाकरे यांचे भाषण होईल. सभेतून महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता याआधी झालेल्या पदाधिकारी बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी काळात पक्ष कोणती भूमिका घेणार, तसेच युतीनंतरची राजकीय समीकरणे कशी असतील, याबाबत महत्त्वाचे संकेत या सभेतून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या या मेळाव्याकडे लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर