पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण:CBI ची मोठी भूमिका; आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान देणार

२० वर्षांपूर्वी महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. भरदिवसा झाली होती पवनराजेंची हत्या तत्कालीन काँग्रेस (आय) पक्षाचे नेते पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी नवी मुंबईत भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांचे वाहनचालकही मृत्युमुखी पडले होते. या दुहेरी हत्याकांडाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने दाखल केले होते आरोपपत्र तपासादरम्यान सीबीआयने सखोल चौकशी करून २० ऑगस्ट २००९ रोजी मुख्य आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर ४ जून २०१० रोजी पुरवणी आरोपपत्रही सादर करण्यात आले. या प्रकरणात माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण ९ जणांविरुद्ध आरोप ठेवण्यात आले होते. खटल्यादरम्यान एका आरोपीने माफीचा साक्षीदार (अ‍ॅप्रूव्हर) म्हणूनही भूमिका बजावली होती. सत्र न्यायालयाचा सर्व आरोपींना दिलासा दीर्घ सुनावणीनंतर मुंबईतील ५५व्या सत्र न्यायालयाने २० जून २०२६ रोजी दिलेल्या निकालात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. पुरावे आणि साक्षींच्या आधारे आरोप सिद्ध करण्यात तपास यंत्रणेला अपयश आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या निकालामुळे धाराशिव आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ‘आमच्याकडे भक्कम पुरावे होते’ : सीबीआय मात्र, सीबीआयने न्यायालयाच्या निर्णयाशी असहमती दर्शवली आहे. तपासादरम्यान आरोपींविरोधात भक्कम आणि विश्वासार्ह पुरावे गोळा करण्यात आले होते, असा दावा सीबीआयने केला आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच यासंदर्भातील अपील दाखल केले जाणार असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले. पुढे काय होणार? सत्र न्यायालयाच्या निकालानंतर आरोपींना मोठा दिलासा मिळाला असला तरी सीबीआयच्या अपीलमुळे हे प्रकरण आता पुन्हा न्यायालयीन लढाईच्या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. उच्च न्यायालय या प्रकरणात सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवते की त्यावर पुनर्विचार करण्याचे आदेश देते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पवनराजे निंबाळकर हत्याकांड हे गेल्या दोन दशकांतील राज्यातील सर्वाधिक चर्चित राजकीय गुन्हेगारी प्रकरणांपैकी एक मानले जाते. त्यामुळे उच्च न्यायालयातील पुढील सुनावणी आणि त्यातून येणारा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. संबंधित बातम्या वाचा… पवनराजे हत्याकांडातील सीबीआय कोर्टाचे 10 सर्वात मोठे खुलासे:माफीचा साक्षीदार अविश्वसनीय, मोबाईलचे सीडीआर गायब, अन् पोलिसांच्या घोडचुका महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआय (CBI) कोर्टाने आपला ऐतिहासिक निकाल देताना तपास यंत्रणा, पोलीस आणि सीबीआयच्या अत्यंत ढिसाळ कारभारावर प्रचंड कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या खटल्याचा संपूर्ण पाया ज्या ‘माफीच्या साक्षीदारावर’ उभा होता, त्यालाच न्यायालयाने अविश्वसनीय आणि सोयीनुसार खोटे बोलणारा ठरवले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा एक मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या कोर्ट क्रमांक ५५ मध्ये पार पडलेल्या या सुनावणीतील १० सर्वात मोठे खुलासे आणि कोर्टाची सविस्तर निरीक्षणे येथे वाचा संपूर्ण बातमी पवनराजे हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल:पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; ओमराजे म्हणाले- निकाल दुर्दैवी, आता हायकोर्टात दाद मागणार राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने दिलेल्या या धक्कादायक निकालामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, निंबाळकर कुटुंबासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी ऑपरेशन टायगर संकटात:ओमराजे म्हणाले – शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही, मतदारसंघात जावून चर्चा करून पुढचे ठरवणार!
‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर संकटात आल्याचे बोलले जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Comment

error: Content is protected !!