ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

भोंदू अशोक खरातचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडेच:केवळ फोटोवरून राजकारण नको, इंटेलिजन्सच्या आधारे आम्हीच भांडाफोड केली – CM

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भोंदू बाबा अशोक खरात यांच्याकडे विरोधी पक्षातील कोणकोणते नेते जात होते याचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वांत जास्त पुरावे आहेत, पण ते पोलिसांकडे आहेत, ते पोलिसांचे काम आहे, खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचे यात सहभाग असेल तर कारवाई होईल, पण केवळ भेटलंय म्हणून कारवाई करायला लागलो तर कोणी त्यांना 40 किमी पाण्याची लाईन दिली हे सर्वांना समजले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भोंदू बाबा प्रकरणी हवेत बोलण्याला काही अर्थ नाही. खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे, त्या प्रकरणाचा भांडाफोडा आम्हीच केला आहे. या प्रकरणात महिला लाजेखातर पुढे येत नाही, पण पिडीत महिलांना त्यांच्या कुटुंबियांना धीर देत पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात काही महिला प्रतिसाद देत आहेत. प्रकरणाकडे लक्ष घालण्याच्या सूचना मी डीजींना दिल्या आहे ते या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. एसआयटी आणि नाशिक सीपी मिळून हे काम पूर्ण करत आहेत. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. फोटो कुणाचेही असू शकतो देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरात प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो नक्की आणून द्यावा त्यावरही कारवाई होईल. पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. सरकार आणि पोलिस जे करायचे ते करत कठोर कारवाई करतील. फोटो कुणाचेही असू शकतो, पण ज्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून 40 किलोमीटरची पाइपलाइन वळवून अशोक खरातच्या संस्थेला पाणी दिले, त्या मंत्र्यांबाबत विरोधक गप्प का आहेत? केवळ फोटोवरून राजकारण करणाऱ्यांनी या धोरणात्मक निर्णयावर का मौन पाळले आहे? महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला राजकारणात नाही तर महिलांच्या प्रतिष्ठेत इंटरेस्ट आहे. महिलांवर जे अन्याय झालेत त्यासंदर्भात आधी चौकशी होईल, प्रत्येक महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, महिलांना न्याय देण्यासाठी चौकशी करणार.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर