ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

अशोक खरातच्या अडचणीत वाढ:ऑफिसबॉयच्या सीडीआरमधून 40 महिलांचे नंबर आले समोर; पोलिसांसमोरच दोघांमध्ये शाब्दिक वाद

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, विशेष तपास पथकाने शनिवारी अशोक खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधव यांची समोरासमोर बसवून चौकशी केली असता, पोलिसांदेखतच दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या नाट्यमय घडामोडीसोबतच नीरज जाधवच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डमध्ये (सीडीआर) तब्बल 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. या नव्या धाग्यादोऱ्यांमुळे एसआयटीच्या हाती लवकरच ठोस पुरावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अशोक खरात प्रकरणाच्या तपासात विशेष तपास पथकाने मोठी कारवाई करत खरातच्या ‘ईशान्येश्वर’ मंदिराशी संबंधित पुजारी आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या महत्वपूर्ण पावलामुळे मंदिराच्या नावाखाली चालणाऱ्या संशयास्पद हालचाली आणि या संपूर्ण प्रकरणातील दडलेले अनेक धक्कादायक धागेदोरे लवकरच उलगडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विशेष तपास पथकाने नीरज जाधवच्या कॉल डिटेल रेकॉर्डची सखोल तपासणी केली असता, त्यामध्ये तब्बल 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळल्याने या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. ‘फोकस प्रॉपर्टी’ येथे ऑफिसबॉय म्हणून काम करत असताना नीरज या महिलांच्या सतत संपर्कात राहून त्यांना अशोक खरातचे निरोप पोहोचवत असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या खुलाशामुळे नीरज जाधवच्या माध्यमातून महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची दाट शक्यता असून, या भोंदूबाबाची सर्व काळी कृत्ये आणि गुन्हेगारी कुंडली लवकरच उघड होणार असल्याची शक्यता आहे. अशोक खरात प्रकरणातील तपासाचा वेग कायम असून, आज रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही एसआयटीचे अधिकारी हिमांशू चौकशीसाठी पोलिस क्लब येथे दाखल झाले आहेत. खरातची आज पुन्हा एकदा एसआयटीमार्फत कसून चौकशी केली जाणार असून, या चौकशीतून नवीन आणि महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. आयकर विभागाची प्रकरणात उडी या प्रकरणाला आता आर्थिक वळण मिळाले असून, एसआयटीच्या जोडीला आयकर विभागाने देखील या तपासात उडी घेतली आहे. खरातच्या नावावर असलेल्या कोट्यवधींच्या मालमत्ता, संशयास्पद व्यवहार, उत्पन्नाचे स्त्रोत आणि प्राप्तिकर विवरणपत्रांची आता सखोल पडताळणी होणार आहे. विशेष म्हणजे, त्याला आर्थिक मदत करणारे देणगीदार आणि त्याचे व्यावसायिक भागीदारही आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले असून, खरातच्या मोठ्या आर्थिक जाळ्याचा लवकरच पर्दाफाश होण्याची चिन्हे आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर