ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

यवतमाळ येथे युवा कवयित्री प्रांजली तुराणकर इला समाज गौरव पुरस्कार’

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव यवतमाळ, दि. २२ मार्च २०२६ : येथील आयोजित परिचय मेळावा व विचारवंतांची परिषद २०२६ या कार्यक्रमात युवा कवयित्री कु. प्रांजली रामदास तुराणकर यांना ‘इला समाज गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक तसेच साहित्यिक कार्याची दखल घेऊन देण्यात आला.


कार्यक्रमाच्या उद्घाटिका श्रीमती आशाताई काळे (संचालिका, ग्राम स्वराज्य महामंच) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अतिशय लहान वयात साहित्य क्षेत्राची वाट निवडून प्रांजली तुराणकर यांनी आपल्या कवितांद्वारे समाजजागृतीचे कार्य हाती घेतले असून त्यांच्या कार्याचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.

प्रांजली तुराणकर या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील एका शेतकरी कुटुंबातील कन्या आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत त्यांनी साहित्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय वामनराव श्रीराम (जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली) होते. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आमदार बाळासाहेब मांगुळकर (यवतमाळ विधानसभा क्षेत्र), प्रमुख अतिथी म्हणून अॅड. वामनरावजी चटप (माजी आमदार तथा शेतकरी नेते, राजुरा विधानसभा क्षेत्र) उपस्थित होते.

तसेच डॉ. अंजली गवारले, पृथ्वीराज राजपूत (विदर्भ राज्य आंदोलन समिती) आणि डॉ. प्रशांत विघे (सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ) यांचीही विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन मधुसूदन कोवी गुरुजी (अध्यक्ष, ग्राम स्वराज्य महामंच) यांनी केले.

कार्यक्रमात विविध मान्यवरांनी प्रांजली तुराणकर यांच्या लेखन कौशल्याचे व सामाजिक भानाचे विशेष कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर