ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

अपघातात जखमी झालेल्या दोघांचाही मृत्यू

2.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

निंबाळा फाट्याजवळ झाला होता अपघात

सुरेश पाचभाई मारेगाव

निंबाळा फाट्याजवळ पहापळ येथील दोन मित्रांचा अपघात झाला होता.त्या दोन्ही मित्रांचा शनिवारी मृत्यू झाला.या घटनेने तालुक्यातील पहापळ येथे शोककळा पसरली आहे.

वणीवरून आपले काम आटोपून पहापळ येथे परत येत असताना पहापळ येथील विजय संभाजी थेरे वय अंदाजे 35 वर्ष व नितीन खुशाल पायघन वय अंदाजे 28 वर्ष या दोन मित्रांचा MH 31 X 340 या हिरो होंडा एस एस दुचाकीचा दि.7 जानेवारीला निंबाळा फाट्याजवळ अपघात झाला होता.

या अपघातात विजय आणि नितीन दोघेही गंभीर जखमी झाले होते.या दोघांनाही नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दोघांनीही शनिवारी अखेरचा श्वास घेतला.एकाच गावातील दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाल्यामुळे पहापळ सोबतच अख्या तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

यातील विजय थेरे याला एक मुलगी असून नितीन पायघन हा अविवाहित होता.दोघांवर शनिवारी पहापळ येथे अंत्यविधी करण्यात आला.जनावर आडवे गेल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. तर काही जण अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाल्याचे सांगतात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर