ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कॉंग्रेसला कळायला पाहिजे:महाराष्ट्रात नंतर काय त्रास होईल, हे त्यांना दिसले; बारामती निवडणुकीवरून पार्थ पवारांचा इशारा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दिवंगत नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. येथील निवडणूक बिनविरोध करून अजित पवारांना श्रद्धांजली देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. असे असतानाही कॉंग्रेसने उमेदवार जाहीर केला. यावरून आता पार्थ पवारांनी थेट कॉंग्रेसला इशाराच दिला आहे. पार्थ पवार म्हणाले, माझे कोणाशी बोलणे झाले नाही. कॉंग्रेसला कळायला पाहिजे, काय करायचे ते. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहीत नाही. सगळे मोठे लोक आहेत. सर्वांना माहीहती आहे काय चालले आहे. त्यांनी विचार केला असेल तर करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल, अशा शब्दात पार्थ पवारांनी नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे. कॉंग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू पुढे बोलताना पार्थ पवार म्हणाले, जे दादांसाठीचे प्रेम आहे लोकांच्या मनात, ते लोक विसरत नाहीत. अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचे आहे. मला वाटते की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसे सामोरे जावे लागते. आम्ही सामोरे जाऊ, आम्ही काही कोणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिले आहे ते बघू. फक्त मला वाईट वाटत आहे की कॉंग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू आहे. सुनेत्रा पवारांनी केला होता हर्षवर्धन सपकाळांना फोन दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने रविवारी आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केली असून, यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे शिष्टाईचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसत आहे. उमेदवारीची अधिकृत घोषणा दिल्लीतून होण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामतीत उमेदवार न देता महायुतीला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने सुनेत्रा पवार यांची ही मध्यस्थी निष्फळ ठरली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर