ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

राजकारणात मोठा धक्का:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांना फोन; बारामतीतील निवडणुकीबाबत चर्चा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थेट फोन करून बारामतीतील निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या संवादामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेसने सुरुवातीपासूनच माघार न घेण्याची भूमिका घेतल्याने लढत अटळ मानली जात होती. अशा परिस्थितीत फडणवीसांनी थेट काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क साधल्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती फडणवीसांनी केली. अचंबित करणारा क्षण राज्यातील सत्ताधारी पक्षाचा प्रमुख नेता विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना थेट फोन करून निवडणुकीसंदर्भात चर्चा करणे, ही दुर्मीळ बाब मानली जात आहे. त्यामुळे या घटनेला राज्याच्या राजकारणातील अचंबित करणारा क्षण मानले जात आहे. फडणवीसांच्या या फोननंतर काँग्रेसची भूमिका बदलते का, याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. संपूर्ण पाठिंबा देण्याचा शब्द दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या विषयावर काँग्रेसमध्ये विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे. याआधी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी संपूर्ण पाठिंबा देण्याचा शब्द दिल्याची माहिती आहे. त्यानंतर लगेचच काँग्रेसशी संपर्क साधल्याने या हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर