ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

बंडखोरांना शिवसेना ठाकरे गटाचा दणका:मुंबईतील 26 बड्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी; अनिल परबांच्या निकटवर्तीयावरही कारवाई

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीतही माघार न घेता, अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे करत, बंडखोराी करणाऱ्या नेत्यांना ‘मातोश्री’ने घरचा रस्ता दाखवला आहे. वारंवार देण्यात आलेले आदेश आणि अल्टिमेटम धुडकावून लावणाऱ्या २६ प्रमुख पदाधिकाऱ्यांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. हकालपट्टी केलेल्यांमध्ये अनिल परब यांच्या निकटवर्तीयावरचाही समावेश आहे. यासंदर्भात ठाकरे गटाने एक अधिकृत पत्रक जारी केले आहे. या कारवाईत प्रभाग क्र. ९५ मधील शेखर वायंगणकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. वायंगणकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरातील पक्ष संघटनेत त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईची कारणे काय? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ‘एबी फॉर्म’ धारक उमेदवारांविरोधात अर्ज भरून तो मागे न घेतल्याने ही कारवाई झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या युतीमध्ये जागावाटप झाले आहे. मित्रपक्षांच्या वाट्याला आलेल्या जागांवरही बंडखोरी केल्याने युती टिकवण्यासाठी हे पाऊल उचलले गेले. एकाच पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात असल्यास मतविभागणी होऊन त्याचा फायदा थेट भाजप किंवा शिंदे गटाला मिळू शकतो, हे नुकसान टाळण्यासाठी बंडखोरांना बाहेर काढले गेले. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. बड्या नेत्यांवर कारवाई करून इतर पदाधिकाऱ्यांनी अशी हिंमत करू नये, असा जरब बसवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. ठाकरे गटाने जारी केलेल्या पत्रकानुसार हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी आणि प्रभागांची नावे खालीलप्रमाणे दरम्यान, या मोठ्या कारवाईमुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची अधिकृत फळी अधिक ताकदीने मैदानात उतरणार की बंडखोर अपक्ष म्हणून मोठे आव्हान उभे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर