ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

नाशिक काॅर्पोरेट जिहाद:लग्नाचे आमिष, धर्मांतरासाठी दबाव-ब्लॅकमेलिंग, हिंदू मुलगी म्हणूनच मला केलं टार्गेट- पीडिता

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आयटी क्षेत्रात माझं करिअर घडवायला गेली अन‌् आता मी आज अशा वळणावर उभी आहे, जिथे माझा विश्वास आणि माझा धर्म दोन्ही पायदळी तुडवले गेलेत. सोबत शिक्षण घेतलेल्या दोन मुलाच्या बापानं माझ आयुष्य उध्वस्त केलं. कॉर्पोरेट जिहादमधील पीडित युवतीने ‘दिव्य मराठी’कडे कथन केलेली काळजाचा थरकाप उडवणारी आपबीती तिच्याच शब्दात… मी 2022 मध्ये कॉलेजमध्ये शिकत होते. तानिश शेख आयुष्यात आला. त्याने मोठ्या कंपनीत नोकरी लावून देतो, असे अश्वासन दिले. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याने लग्नाचे आमिष देत जवळीक साधली. मी विरोध केला. त्याने वचन दिलं, परत असं होणार नाही. मला तो प्रामाणिक वाटला, पण तो माझ्या आयुष्याशी खेळत होता. नोकरी लागल्यानंतर छळ सुरू झाला. तानिशसोबत तौसिफ अख्तर आणि निदा खान यांनी सुरुवातीपासूनच कट रचला होता. तुझा धर्म चुकीचा आहे, असे सांगत त्यांच्याकडून ब्रेन वॉशचा प्रयत्न सुरू होता. ऑगस्ट 2024 मध्ये तानिशने मला एका हॉटेलवर नेलं, तिथे माझ्यावर अत्याचार केला. त्याचा मित्र तौसिफने मला ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली. तुमचे दोघांचे फोटो माझ्याकडे आहे. तुझ्या घरी सांगेन, अशी धमकी देत माझ्यासोबत अश्लील चाळे करायचा. संबंध ठेवले नाही तर सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. यामुळे मी स्वत:च्या नजरेत रोज मरत होते. भावनांचा खेळ झाला फेब्रुवारी 2026 मध्ये एका महिलेचा मेसेज आला. तिने सांगीतले मी तानिशची पत्नी आहे. त्याला दोन मुलं आहेत. ज्यानं लग्नाचे स्वप्न दाखवलं, माझ शोषण केलं तो अधीच विवाहित होता. त्याने मला केवळ हिंदू मुलगी म्हणून टार्गेट केलं होतं. तो आणि तौसिफ, निदा खान यांनी माझ्या भावनांशी, शरीराशी आणि धर्माशी खेळ मांडला होता. ‘कॉर्पोरेट जिहाद’चा केंद्रीय यंत्रणेकडून गोपनीय तपास कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेकडून दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी अत्यंत गोपनीय तपास सुरू केल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. प्रकरण गंभीर वळणावर गेले असून केंद्राकडून उच्चस्तरीय तपास सुरू केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून स्थानिक अधिकाऱ्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. येथील एका नामांकीत आयटी कंपनी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, एका तरुणाच्या धर्मांतराचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. यामागे बड्या कार्पोरेट आयटी क्षेत्रातील नामांकीत कंपन्यामध्ये विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचे नेटवर्क तयार करुन मोक्याची पदे काबीज केली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून ठरावीक समुदायाला लाभ मिळून देण्याचा डाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयटी क्षेत्रात गुणवत्ता डावलून केवळ विशिष्ट ओळखीच्या आधारावर उच्च पदांवर नियुक्तीचे तपासात निष्पन्न झाले आहे. परकीय निधी देणाऱ्या अदृश्य हातांचा शोध केंद्रीय तपास यंत्रणेकडून नाशिकसह राज्य तसेच देशातील मोठ्या शहरातील बड्या कंपन्याच्या कागदपत्रांची छाननी सुरू करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. नाशिक डिफेन्स हब म्हणून ओळखले जाते. यात परकीय निधी पुरवल्याचीही शंका आहे. त्यामुळे शहरातील कॉर्पोरेट हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर