ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

चिखलीकर भावी मंत्री, नादी लागू नकोस:माजी नगरसेवकाच्या अपहरणाने खळबळ; नांदेडमध्ये गुंडगिरीचा कळस, आज बंद

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नांदेड शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. नांदेड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांचं भरदिवसा अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झालं आहे. आपणास जबरदस्तीने पळवून नेऊन जीवघेणी मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्वतः जीवन घोगरे यांनी केला आहे. या हल्ल्यामध्ये आपण गंभीर जखमी झालो असून, अपहरणकर्त्यांनी तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. घटनाक्रमाबाबत माहिती देताना जीवन घोगरे यांनी सांगितलं की, सोमवारी दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास ते कामानिमित्त घराबाहेर पडले होते. हडको परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ आल्यानंतर अचानक त्यांची कार अडवण्यात आली. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने दुसऱ्या वाहनात बसवलं आणि अज्ञात स्थळी घेऊन गेले. त्या ठिकाणी सात जणांनी आपल्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप घोगरे यांनी केला आहे. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही वेळानंतर मुसलमानवडी परिसरात त्यांना रस्त्यावर सोडून देण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. या प्रकरणात जीवन घोगरे यांनी अजित पवार गटातील लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. वृत्त वाहिन्यांशी बोलताना घोगरे यांनी सांगितलं की, या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे आणि प्रवीण पाटील चिखलीकर असल्याचा त्यांना संशय आहे. अपहरणकर्त्यांनी मारहाण करताना चिखलीकर भावी मंत्री आहेत, त्यांच्या नादी लागू नकोस, अशी धमकी दिल्याचाही दावा त्यांनी केला. इतकंच नव्हे तर, जमीन बळकावणे, कब्जे करणे हेच या लोकांचे उद्योग असल्याचा गंभीर आरोपही घोगरे यांनी केला आहे. सात आरोपींपैकी तीन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार या हल्ल्यानंतर जीवन घोगरे यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल केला आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला तुम्ही मंत्री करणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी नांदेडमधील गुंडाराज संपवण्याचं आवाहन केलं. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांना अटक केली असून, घोगरे यांच्या फिर्यादीनुसार संबंधित आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी तीन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, राजकीय दबावाखाली तपास होणार नाही ना, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिडको परिसर पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी नांदेड शहरातील सिडको परिसर पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीवन घोगरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, निवडणुकांच्या तोंडावर शहरात अशा प्रकारची गुंडगिरी वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शुभम दत्ता सुनेवाड, राहुल मारोती दासरवाड, कौस्तुभ रमेश रणवीर, विवेक नरहरी सूर्यवंशी, माधव बालाजी वाघमारे, मोहंमद अफ्रोज फकीर (चालक) आणि देवानंद भोळे अशी आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना नांदेडच्या राजकारणाला कोणती दिशा देणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर