ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

ग्रामजागृतीचा धडाका! कानडा (पार्डी)त ग्राम जयंती सप्ताहात विकासाची नवी पहाट; वाचनालयाचे दिमाखात उद्घाटन

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव : तालुक्यातील पंचायत समिती मारेगाव अंतर्गत येणाऱ्या कानडा (पार्डी) गावाने ग्रामजागृतीचा आदर्श घालून देत ग्राम जयंती सप्ताह उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला. विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या मालिकेतून ग्रामविकासाचा ठोस संदेश देण्यात आला. या सप्ताहाचा समारोप दि. ३० एप्रिल २०२६ रोजी नूतन वाचनालयाच्या दिमाखदार उद्घाटनाने झाला.

सरपंच सौ. सुषमा रूपेश ढोके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी सुनिल देऊळकर यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित राहून ज्ञानवृद्धीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. “वाचनालय ही केवळ पुस्तके ठेवण्याची जागा नसून, गावाच्या प्रगतीचा पाया आहे,” असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ‘ग्राम जयंती’ सप्ताहात दि. २४ एप्रिलपासून सामुदायिक प्रार्थनेने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्वच्छता अभियान, शासकीय व निमशासकीय योजनांची माहिती, शेती मार्गदर्शन, लोकसेवा हक्क, महिला सक्षमीकरण, वृक्षसंवर्धन व व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर प्रभावी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमात कृषी व उद्योग क्षेत्रातील संधींबाबत विकास झीने यांनी मार्गदर्शन केले, तर आशिष लोडे यांनी विषमुक्त शेती व गांडूळ खत निर्मितीचे महत्त्व पटवून दिले. तसेच यवतमाळ बँकेचे प्रतिनिधी टिपू सुलतान देशमुख यांनी विविध अर्थसहाय्य योजना व दुग्धव्यवसायाच्या संधींची माहिती दिली.

या सोहळ्यास माजी सरपंच प्रमोद धोबे, उपसरपंच किशोर मंदे, सदस्य रेखा आस्कर, सदस्य प्रशांत चवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपेश ढोके यांनी केले, प्रास्ताविक ग्रामसेवक प्रभाकर फूलभोगे यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन सूरज येवले यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान ‘ग्रामगीता’तील ओव्यांमधून ग्रामविकासाचा संदेश देत “गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा” या विचारांनी उपस्थितांना प्रेरित करण्यात आले.ग्राम जयंती सप्ताहाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे कानडा (पार्डी) गावात सामाजिक बांधिलकी, जनजागृती आणि विकासाची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर