ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

2.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राज्य महामार्गावरील गोविंदराजा कोटेक्स जवळील घटना

 सुरेश पाच भाई मारेगाव 

मारेगाव तालुक्यातील राज्य महामार्गावरी गोविंदराजा कोटेक्स जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 20 जून 2025 रोज शुक्रवारला 4 वाजताच्या सुमारास घडली.

An unknown vehicle hit a two-wheeler at high speed; the two-wheeler rider was seriously injured

अमित भास्कर दर्वे  वय अंदाजे 24 वर्षे रा.महागाव( सिंधी) ता.मारेगाव असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहेत. अमित हा आज सकाळी महागाव येथून काही कामानिमित्त मारेगाव येथे आला होता.तेथील काम आटोपून तो दुपारी 4 वाजता सुमारास स्वगावी महागाव ( सिंधी) येथे जाण्याकरिता निघाला पण रस्त्यातच अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली यात तो गंभीर जखमी झाला झाला.

रस्त्याने ये – जा करणाऱ्या काही नागरिकांनी सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. व त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरित केल्याची माहिती आहे.सदर अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर