ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

महाराष्ट्रात ‘शून्य सावली’चा अनुभव सुरू:3 ते 31 मे दरम्यान विविध शहरांमध्ये दिसणार हा खगोलशास्त्रीय चमत्कार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात यंदाही मे महिन्यात ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येणार आहे. ३ मे ते ३१ मे दरम्यान राज्यातील विविध शहरांमध्ये काही क्षणांसाठी वस्तूंची सावली पूर्णपणे नाहीशी होईल. हा एक खगोलशास्त्रीय चमत्कार असून, तो नागरिकांना विज्ञानाची प्रत्यक्ष जाणीव करून देतो. ‘शून्य सावली दिवस’ म्हणजे असा क्षण, जेव्हा दुपारी सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर (९० अंशांच्या कोनात) येतो. यामुळे कोणत्याही उभ्या वस्तूची सावली काही मिनिटांसाठी पूर्णपणे नाहीशी होते. पृथ्वीवरील कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यानच्या प्रदेशात वर्षातून दोनदा हा अनुभव येतो – एकदा उत्तरायणात आणि एकदा दक्षिणायनात. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशांनी कललेला असल्यामुळे सूर्याची किरणे वर्षभर उत्तर-दक्षिण दिशेने सरकतात. यामुळे कर्कवृत्त (२३.५° उत्तर) आणि मकरवृत्त (२३.५° दक्षिण) यांच्या दरम्यानच्या भागांमध्ये सूर्य कधी ना कधी थेट डोक्यावर येतो. भारतात, अंदमानमधील इंदिरा पॉइंट येथे एप्रिलमध्ये या घटनेची सुरुवात होते आणि कर्कवृत्ताजवळ त्याचा शेवट होतो. महाराष्ट्रात कोल्हापूर (१५.६° अक्षांश) ते धुळे (२१.९८° अक्षांश) या पट्ट्यात ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येईल. याची सुरुवात ३ मे रोजी सावंतवाडीपासून झाली. १३ मे रोजी पुणे परिसरात, १५ मे रोजी मुंबई आणि नवी मुंबईत, तर २६ मे रोजी नागपूर आणि भंडारा येथे ही घटना दिसेल. ३१ मे रोजी धुळे जिल्ह्यातील तोरणमाळ येथे याचा शेवट होईल. प्रत्येक शहरासाठी वेळेत काही सेकंदांचा फरक असला तरी, साधारणतः दुपारी १२ ते १२:३५ या वेळेत हे निरीक्षण करता येते. ‘शून्य सावली’चा अनुभव घेण्यासाठी कोणत्याही विशेष साधनांची आवश्यकता नाही. यासाठी एक उभी वस्तू, जसे की काठी, पाईप किंवा स्वतः व्यक्ती, मोकळ्या जागेत किंवा घराच्या छतावर उभी करावी. दुपारी दिलेल्या वेळेत सूर्याचे निरीक्षण केल्यास, सूर्य डोक्यावर आल्यावर सावली पूर्णपणे नाहीशी झाल्याचे दिसेल. हा क्षण काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत टिकू शकतो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर