ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

सायकलस्वारांचा ग्रीन हिंगोली हेल्दी हिंगोलीचा संकल्प:रॅलीला मोठा प्रतिसाद, जिल्हा सायकल संघटनेचा पुढाकार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सायकल चालवा, आरोग्य घडवा’, पर्यावरण वाचवा आरोग्य जपा, आपली हिंगोली ग्रीन हिंगोली हेल्दी हिंगोलीच्या घोषणादेत हिंगोलीत शेकडो सायकलस्वारांनी बुधवारी ता. ३ काढलेल्या सायकल रॅलीत ग्रीन हिंगोली हेल्दी हिंगोलीचा संकल्प केला. यावेळी शेकडो सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला होता. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभुमीवर सद्‌भाव सेवाभावी संस्था, जिल्हा सायकल संघटना, आशा सायकल यांच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी सात वाजता सायकल रॅलीस सुरवात झाली. शहरातील पोस्ट ऑफिस रोड, जवाहर रोड, गांधी चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इंदिरा गांधी चौक, पीपल्स बँक, जिल्हा परिषद रोड, जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता आणि नगर पालिका मार्गावरून रॅली एनटीसी मध्ये विसर्जित करण्यात आली. वाढत्या प्रदूषणाला पर्याय म्हणून प्रत्येकाने झाडे लाऊन त्यांचे संगोपन करावे तसेच आरोग्यासाठी दैनंदिन जिवनात सायकलचा वापर करावा, नैसर्गिक, देशी झाडं लावावी, जगवावी, पाऊसपाणी संकलन कराव, सिंगल वापर प्लास्टिकचा वापर बंद करावा, कचरा जाळू नये, तो घंटा गाडीतच टाकावा हा संदेश या रॅलीच्या माध्मयातून देण्यात आला. या पर्यावरणपूरक उपक्रमात हिंगोलीतील डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यामध्ये डॉ. यशवंत पवार, डॉ. राम मुंडे, डॉ.अभयकुमार भरतीया, प्रविण काळबांडे, डॉ. संजय नाकाडे,डॉ. अमित शाह, डॉ. प्रेमेन बोथरा, डॉ. गजानन शिंदे, संजय घन, गणेश पाटील, विनोद खरात, रमेश सानप, विठ्ठल जाधव, मारोती बोबडे,किरण लाहोटी, रत्नाकर महाजन, विठ्ठल गवळी, शिवचरण ठाकूर यांच्यासह नागरीकांचा समावेश होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर