ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न:आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही- गणेश नाईक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला असतानाच, दुसरीकडे महायुतीचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी फडणवीसांची जोरदार पाठराखण केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वसमावेशक भूमिकेचे असतानाही केवळ ते ‘ब्राह्मण’ असल्यामुळेच त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला आहे. मंत्री गणेश नाईक यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतली. देवेंद्र फडणवीस हे समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा याच भूमिकेचे आहेत. मात्र, ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेला, ज्याला राजकारण समजते त्याला हा सर्व प्रकार सहज लक्षात येईल, अशा शब्दांत नाईकांनी विरोधकांना सुनावले आहे. याचवेळी आजच्या बदलत्या राजकारणावर बोलताना त्यांनी, सध्याच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही. तुम्ही केवळ स्वच्छ विचारसरणीचे आहात म्हणून लोक तुम्हाला निवडून देतील, याची आज शाश्वती राहिलेली नाही, अशी खंतही व्यक्त केली. सातारा संस्थानचा जीआर का काढला नाही दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा मुंबईला गेलो, तेव्हा हैदराबादचा जीआर काढून त्याची अंमलबजावणी केली गेली, त्यावेळी आम्ही सरकारचे कौतुकही केले. काही प्रमाणपत्रे वाटली, पण त्यानंतर पुढे काय? असा सवाल जरांगे यांनी केला. सातारा संस्थानचा जीआर एका महिन्यात काढू म्हणेन आठ महिने उलटून गेले, तरीही तो निघालेला नाही. राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन अद्याप हवेतच आहे, ज्यांचे कुणबी रेकॉर्ड सापडले त्यांना व्हॅलिडीटी दिली जात नाही आणि शिंदे समिती आता रेकॉर्ड शोधत नाही, असा पाढाच त्यांनी वाचला. मराठ्यांनीच तुम्हाला सीएम केले मनोज जरांगे पुढे म्हणाले की, माझे फडणवीसांबद्दल वैयक्तिक वाईट मत नाही. पण माझ्या समाजाचे वाटोळे होणार असेल तर मी तुमच्यापैकी कोणालाच मोजणार नाही. मला मित्र नकोत की मंत्र्यांशी संबंध नकोत, मला फक्त माझ्या समाजाची लेकरं मोठी करायची आहेत. फडणवीस म्हणतात की मंत्र्यांना किंमत नसते, मुख्यमंत्रीच सर्वकाही असतो; मग आमची प्रमाणपत्रे अचानक देणे का बंद झाले? हे सर्व नेमके काय चालले आहे? मराठ्यांनीच तुम्हाला मुख्यमंत्री केले होते हे लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल की तेच हुशार आहेत, तर शेतकरी आणि मराठा समाजही तितकाच हुशार आहे. फडणवीस तुम्ही काय, तुमच्या 50 पिढ्या जरी आल्या तरी मी मराठ्यांना धक्का लागू देणार नाही, असा इशारा देत जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. सरकारने येत्या 30 मे पूर्वी सर्वांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, अन्यथा 30 मे पासून आपण पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर