ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी वाढल्या:पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; तिकडे परांजपे पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत उभयंतांत कोणती चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांची कथित नाराजी व पक्षाशी संबंधित इतर काही मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेनेचे नेते आनंद परांजपे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे या घडामोडींकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. पार्थ पवार एकटेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री 10 वा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ते यावेळी एकटेच होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा कोणताही बडा नेता किंवा कोणताही सहकारी उपस्थित नव्हता. या दोन्ही नेत्यांत जवळपास 45 मिनिटे चर्चा झाली. पण त्या चर्चेचा तपशील अद्याप समोर आला नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी नेमका कोणत्या मुद्यांवर संवाद साधला हे कळू शकले नाही. पण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला मोठे महत्त्व आले आहे. विशेष म्हणजे गत काही दिवसांपासून सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे हे दोन्ही बडे नेते नाराज झाल्याची माहिती आहे. या घडामोडींवर स्थिती स्पष्ट करण्यासाठी राष्ट्रवादीने शनिवारी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे त्यांच्या अनुक्रमे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदांवर पूर्ण अधिकारांसह कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रात या दोन्ही नेत्यांच्या मुख्य पदांचा उल्लेख नव्हता. ती केवळ एक कारकुनी चूक होती. यासंदर्भात आयोगाला लवकरच एक नवे पत्र पाठवून पटेल व तटकरे यांच्यासह पक्षातील इतर सर्व जबाबदाऱ्यांची स्पष्ट माहिती दिली जाईल, असे पक्षाने या प्रकरणी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेला काही तास उलटत नाहीत तोच पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आनंद परांजपे सिल्व्हर ओकवर दुसरीकडे, शिवसेना नेते आनंद परांजपे हे शरद पवार यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले आहेत. आनंद परांजपे हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते 14 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली. पण आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यांचा नुकताच शिवसेना प्रवेश झाला. त्यानंतर प्रथमच त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचा दावा केला जात असला तरी, अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर परांजपे अचानक पक्ष सोडून का गेले? असा प्रश्नही या प्रकरणी उपस्थित केला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर