ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

विधानसभेत ‘तू-तू मैं-मैं’:मंत्र्यांच्या उत्तरांवरून आदित्य ठाकरेंचा सभात्याग; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही पलटवार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थिती आणि त्यांच्याऐवजी इतर मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना उत्तरे देण्याचे अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. विधानसभा अध्यक्षांनी दिलेले स्पष्टीकरण अमान्य करत आदित्य ठाकरेंनी थेट विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार टाकत ‘वॉकआऊट’ (सभात्याग) केला. यानंतर सभागृहात मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना उत्तर दिले, तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उपस्थित राहून आदित्य ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार पलटवार केला. आदित्य ठाकरेंचा सभात्याग आणि ‘अकार्यक्षम’चा आरोप सभात्याग केल्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “या मिंधे सरकारमध्ये नवीन प्रथा सुरू झाली आहे. जे उपमुख्यमंत्री आहेत, ते एवढे अकार्यक्षम आहेत की त्यांना बाहेर पैशांचे आणि रात्रीचे खेळ जमतात, पण सभागृहात बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तरे देता येत नाहीत. त्यामुळेच ते इतर मंत्र्यांना आपला कार्यभार वाटून देतात.” “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दावा केला की २०१९ आणि २०२० मध्येही (महाविकास आघाडीच्या काळात) अशीच उत्तरे दिली गेली होती. मात्र, हे पूर्णपणे खोटे आहे. त्यावेळी कुणीही असा पळवाट काढला नव्हता, प्रत्येक मंत्र्याने पूर्ण जबाबदारीने प्रश्नांची उत्तरे दिली होती. अध्यक्षांनी खुर्चीवर बसून खोटे बोलू नये आणि आपले अगाध कायदेशीर ज्ञान पाजळू नये.” सभागृहात आदित्य ठाकरे विरुद्ध शंभूराज देसाई तत्पूर्वी, सभागृहात याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात मोठी खडाजंगी झाली. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, “अध्यक्षांनी २०१९ आणि २०२० चे रेकॉर्ड तपासावे. जर मंत्र्यांना उत्तरे देता येत नसतील, तर त्यांनी तसे स्पष्ट सांगावे.” यावर संतापून शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले, “सभागृहाचे कस्टोडिअन अध्यक्ष आहेत आणि त्यांनी नियमांनुसारच कामाचे वाटप केले आहे. २०१९ ते २०२२ या महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी (उद्धव ठाकरे) स्वतः सभागृहात किती उत्तरे दिली? तेव्हा तेही त्यांच्या मंत्र्यांना असे अधिकार देत होतेच. मग तुमच्या काळात जे चालले, ते आता का चालत नाही?” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही पलटवार आदित्य ठाकरेंच्या वॉकआऊट आणि आरोपांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उभे राहून थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ६ खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले, “कालच त्यांना एक ‘जोर का झटका धीरे से’ लागला आहे, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणूनच ते फ्रस्ट्रेट (निराश) होऊन डेस्परेटली अशी स्टंटबाजी करत आहेत.” आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवत शिंदेंनी टोला लगावला, “ते आता सभागृहात नाहीत, नाहीतर मी त्यांना नक्की ऐकवले असते की, ‘कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा वाया गेलास तू!’” मंत्र्यांच्या उत्तरांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, “हे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी (सामूहिक जबाबदारी) आहे. राज्यमंत्र्यांना उत्तरे देताना जर काही अडचण आली, तर मी स्वतः तिथे हजर असतो. २०१९ ते २०२२ मध्ये महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) सभागृहात किती वेळ बसायचे आणि कोण उत्तरे द्यायचे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते,’ असा टोला त्यांनी लगावला.” शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांना कानपिचक्या उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे नेते जयंत पाटील आणि नाना पटोले यांनाही सुनावले. “तुम्ही पोरखेळ करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे आणि जनतेचे प्रश्न मांडा, सरकार प्रत्येक प्रश्नाला खंबीरपणे उत्तर देईल. अडीच वर्षांत आम्ही ४५ हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली आहे, महायुती सरकार हे नेहमी जनतेच्या पाठीशी उभे आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आदित्य ठाकरेंचा सभात्याग आणि त्यावरून सत्ताधारी नेत्यांनी दिलेले आक्रमक उत्तर यामुळे आगामी दिवसांतील अधिवेशन अधिकच वादळी आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधिमंडळाच्या कामकाजाशी संबंधित बातमी वाचा… पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:ड्रग्जची माहिती द्या, नाव गुप्त ठेवून बक्षीस मिळवा; अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी फडणवीसांची घोषणा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दुसरीकडे, विविध प्रलंबित मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असताना महायुती सरकारकडून महत्त्वाची विधेयके मांडली जाणार असल्याने आजचे कामकाज वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर