ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक पुन्हा घ्या:धर्मादाय उपायुक्तांचे आदेश, निवडणूक अधिकाऱ्यावर पक्षपाताचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या २०२२ मधील पदाधिकाऱ्यांची निवड अनियमित असल्याचे धर्मादाय उपायुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे संस्थेची निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे संस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, विधानसभेचे माजी उपसभापती प्रा. शरद तसरे आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. उपायुक्त राजेश इंगोले यांच्या न्यायालयाने नव्या निवडणुकीसाठी ३० दिवसांच्या आत मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. १५ मे रोजी हा निकाल जाहीर झाला असून, त्यानुसार १४ जूनपर्यंत नवी मतदार यादी तयार करून त्यानंतर रितसर निवडणूक घेतली जाईल. धर्मादाय उपायुक्तांनी संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे ज्येष्ठ सदस्य हेमंत काळमेघ यांच्या उमेदवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या विधानानुसार, काळमेघ नागपूर येथील एका संस्थेचे विश्वस्त असल्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी ते केवळ एक मतदार आहेत. ‘शिवाजी’च्या उपविधीनुसार त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार नाही. यामुळे त्यांचे सध्याचे पद आणि भविष्यातील उमेदवारी अडचणीत आली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था हा नोंदणीकृत न्यास असून, त्याचा नोंदणी क्रमांक एफ ८९ आहे. संस्थेच्या कार्यकारी परिषदेसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये निवडणूक झाली होती. तत्कालीन सचिव विजय ठाकरे यांनी विजयी पदाधिकाऱ्यांबाबतचा बदल अर्ज (चेंज रिपोर्ट) धर्मादाय उप-आयुक्त यांच्या न्यायालयात दाखल केला होता. हा बदल अर्ज आता फेटाळण्यात आला असून, पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. २०२२ च्या निवडणुकीत ॲड. बी. के. गांधी हे निवडणूक अधिकारी होते. त्यांनी तटस्थ भूमिका न घेता विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या बाजूने कौल दिला, असा विरोधकांचा आरोप आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर