ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

दोन- तीन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट:तालुक्यातील कपाशी उत्पादकांसमाेर प्रश्नचिन्ह‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मारेगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मृग नक्षत्राच्या आगमनानंतर पावसाच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कपाशी व इतर पिकांची टोबणी केली. मात्र त्यानंतर तालुक्यात केवळ तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला असून, अनेक भागांत अद्याप समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज आकाश ढगाळ राहत असल्याने आज-उद्या पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. मात्र दररोज पाऊस हुलकावणी देत असल्याने पिकांची उगवण धोक्यात आली आहे. पेरणीनंतर जमिनीत आवश्यक ओलावा न मिळाल्याने बियाणे खराब होण्याची भीती निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. मृग नक्षत्रावर अनेकांनी शेजारच्या शेतकऱ्यांनी टोबणी केल्याचे पाहून स्वतःही पेरणी करण्याचा निर्णय घेतला. पुढील काळात मजूर उपलब्ध होणार नाहीत, तसेच पाऊस वेळेत येईल, या अपेक्षेने घाईघाईने पेरणीचे काम उरकण्यात आले. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने आता त्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणीची भीती सतावू लागली आहे.तालुक्यात सिंचनाची व्यवस्था अत्यंत मर्यादित असून बोटावर मोजण्याइतक्या क्षेत्रालाच पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे बहुतांश शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत पावसाने पाठ फिरवल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागू शकते. विशेष म्हणजे, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. भरपूर पाऊस होऊनही अपेक्षित उत्पादन मिळाले नव्हते. यंदा मात्र पावसाअभावी वेगळ्याच संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे वाढलेला शेती खर्च, महागडी बियाणे व खते आणि दुसरीकडे अनिश्चित पाऊस यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातील जवळपास ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली असल्याचे चित्र आहे. मात्र येत्या दोन दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण प्रभावित होऊन दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली असून सर्वांच्या नजरा आता आभाळाकडे खिळल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर