ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

अधिक मासानिमित्त गोरक्षण संस्थानात गोदान अन् तुलादान सोहळा उत्साहात:13 दाम्पत्यांचा सहभाग; गोसेवा, गोसंवर्धन, पर्यावरणपूरक उपक्रमांचागौरव

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अधिक मासाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत शहरातील ऐतिहासिक आणि १२५ वर्षांची परंपरा लाभलेल्या गोरक्षण संस्थानात गोपूजन, गोदान व तुलादान सोहळा भक्तिभावाने पार पडला. धार्मिक वातावरणात झालेल्या या सोहळ्यात १३ दाम्पत्यांनी विधीवत गोपूजन करून गोदान केले, तर अनेक गोभक्तांनी तुलादान विधीत सहभागी होत पुण्यसंचय केला. पं. गुरुप्रसाद उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी पार पडले. कार्यक्रमाची सांगता ब्राह्मण भोजन, सामूहिक सहभोजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल अटल होते. यावेळी सचिव किशन सिंघानिया यांनी गोरक्षण संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला, तर राजेंद्र निमोदिया यांनी या विशेष आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. सध्या गोरक्षण संस्थानात सुमारे ३६० गायींचे संगोपन करण्यात येत आहे. त्यांच्या निवास, आरोग्य आणि देखभालीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गोसंवर्धनासोबतच पर्यावरण संरक्षणालाही संस्थेने प्राधान्य दिले असून, विविध उपक्रम राबवले जात आहेत. या धार्मिक व सामाजिक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी केतन मजेठीया, अरुण पोबारू, घनश्याम बागडी, गणेश गुप्ता, किशोर दोषी, ॲड. अशोक गुप्ता, प्रकाश जाजू, पूनम जाजू, रामजीलाल शर्मा, शुक्ला, बाजोरिया, अनिल गाबडा यांच्यासह संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी विशेष परिश्रम घेतले. काचेच्या बाटलीतून दूध होतोय पुरवठा गोरक्षण संस्थानाने पर्यावरण संरक्षणासाठी एक अभिनव पाऊल उचलले आहे. शहरातील ग्राहकांना दूधपुरवठा आता प्लास्टिक पिशव्यांऐवजी काचेच्या बाटल्यांमधून केला जात आहे. वापरलेल्या बाटल्या दुसऱ्या दिवशी परत घेऊन त्यांचा पुनर्वापर केला जातो. या उपक्रमामुळे प्लास्टिकमुक्त पर्यावरणाला चालना मिळत आहे. पर्यावरणपूरक व्यवस्थापनाचा आदर्श ठरत आहे. गोरक्षण संस्थानात गोदान व तुलादान करताना भाविक, महिला व इतर.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर