ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पैनगंगा नदी काठावरील 44‎ गावांना ईसापूर धरणाचे पाणी:जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश, पाणीटंचाई उपाययोजना

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील ४४ गावांमध्ये निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणातून आरक्षित पिण्याच्या पाण्यापैकी ३ दशलक्ष घनमीटर पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. गटविकास अधिकारी, पंचायत समिती उमरखेड यांनी पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये भूजल पातळी घटल्याने गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ग्रामस्थ व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरक्षित पाणीसाठ्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली होती. त्यानुसार उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणात सध्या ४२३.३२४५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, यापूर्वी ९ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. आता अतिरिक्त ३ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, हे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडून नदीकाठावरील गावांतील नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निर्माण होणार आहे.या निर्णयामुळे उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील ४४ गावांतील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकारी यांनी पाणी सोडण्याच्या दिलेल्या आदेशामुळे ४४ गावातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, सर्वांना पाण्याची प्रतिक्षा लालगी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर