ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नवलेवाडीत पर्यावरण संवर्धनाचा काव्यमयी पॅटर्न:125 आंब्यांच्या केशर, हापूस रोपांची लागवड, सोबतीला रंगले काव्य संमेलन‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एकीकडे वाढते तापमान, कमी होत चाललेली वृक्षसंख्या आणि पर्यावरण संवर्धनाची वाढती गरज याबाबत केवळ चिंता व्यक्त होत असताना, जुन्नर तालुक्यातील नवलेवाडीने मात्र कृतीतून एक नवा आदर्श घालून दिला आहे. वृक्षारोपण आणि साहित्याचा अनोखा संगम घडवत नवलेवाडीतील गायरान परिसरात ‘श्रीनाथ फाउंडेशन नवलेवाडी’ आणि ‘पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण सोहळा आणि कवी संमेलनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. केवळ औपचारिकता म्हणून झाडे न लावता, या उपक्रमात दूरदृष्टी ठेवून सुमारे १२५ कलमी केशर आणि हापूस आंब्यांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. भविष्यात ही झाडे जुन्नरच्या निसर्गाला हिरवेगार करणार असून, या परिसरातील ग्रामीण जैवविविधतेलाही यामुळे मोठी चालना मिळणार आहे. या कार्यक्रमाला सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमात विजय लोंढे, रमेश खरमाळे, जितेंद्र बिडवई, वसंत जगताप, सुधाकर डुंबरे, कृषी सहाय्यक राजश्री नरवडे, विमलेश गांधी, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन कांबळे, नितीन शेलार आणि प्रमोद ढगे या मान्यवरांच्या हस्ते प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण होते. पर्यावरण रक्षणासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ फावडं-कुदळ हातात धरूनच नाही, तर कवितेच्या माध्यमातून मनामनात पोहोचवण्यात आला. यावेळी रंगलेल्या काव्य संमेलनात नामवंत कवींनी सामाजिक प्रश्न, पर्यावरण आणि ग्रामीण जीवनावर आधारित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. काव्य संमेलनात संदीप वाघोले, जयराम तांबे, श्रीकांत ढेरंगे, डॉ. केशव बोरकर, राजेश दुरगुडे, डॉ. जयसिंग गाडेकर, साईनाथ पाचारणे, विलास हाडवळे, जालिंदर डोंगरे आणि डॉ. रोहिणी मेहेर या कविंनी सहभाग घेतला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर