ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

अधिकमासानिमित्त भागवत, प्रवचन, पारायण, धार्मिक कार्यक्रमांची चंगळ:शहरातील मोठी देवस्थाने, विविध परिसरांमध्ये पूजा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुरुषोत्तम (अधिक)मासानिमित्त शहरासह जिल्ह्यातील विविध देवस्थाने, मंडळांमध्ये सध्या भागवत, प्रवचन, कीर्तन, पारायण, धार्मिक कार्यक्रमांची चंगळ दिसून येत आहेत. तीन वर्षातून एकदाच अधिक मास येत असल्यामुळे महिला व पुरुष भाविकांच्या गर्दीने देवस्थाने गजबजली आहेत. कोणत्याही देवस्थानांमध्ये पाय ठेवला तरी तेथे धार्मिक कार्यक्रम सुरू असलेले दिसत आहे. भगवान श्री कृष्णांना तुळशी मंजुळा अर्पण केल्या जात आहेत. काहींनी तर पुढाकार घेत स्वत: यजमानपद स्वीकारून अधिक मासानिमित्त धार्मिक कार्यक्रम, प्रसाद वितरण, नाश्ता, सरबत, ताक वितरित करण्यात धन्यता मानल्याचे दिसून येत आहेत. शहरातील बहुतेक श्री संत गजानन महाराज मंदिरांमध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण सुरू असून काही ठिकाणी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मंदिरांमध्ये अभिषेक, महापूजा, महाआरतीही सुरू आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरांनी तर स्वत: पुढाकार घेत धार्मिक अनुष्टानं सुरू केली आहे. अधिक मासातच आषाढी वारीलाही सुरुवात होणार असल्यामुळे भाविकांसाठी ही पर्वणी आहे.११ जून रोजी अधिक मासातील एकादशी असून या एकादशीला फार महत्त्व असल्यामुळे भाविकांचा दिवसभर उपवास राहणार आहे. तसेच शहरातील श्री विठ्ठल, श्री कृष्ण मंदिरांमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्री परमहंस परशराम महाराज सेवाधारी परिवार, जळतापूर-पिंपळोद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचा सामूहिक पारायण सोहळा रविवार ७ जून रोजी श्रीक्षेत्र शेगाव येथे अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात झाला. श्री माहेश्वरी भवन, एसटी स्टँडसमोर, शेगाव येथे सकाळी ८.३० वाजता पारायणास प्रारंभ झाला. विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो भाविकांनी या ऐतिहासिक व धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्री परमहंस परशराम महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली. आयोजनासाठी जयंत सुरेश वानखडे (अमरावती), गोकुळ शेगोकर (आकोट), शंकर खवले (लोखोंडा), शरद देवरणकर (अध्यक्ष, शैव गुरव हितकारणी मंडळ, अमरावती), जयंत पुसदकर (अध्यक्ष, निळकंठेश्वर संस्था, अमरावती), भालचंद्र कथलकर (अंतरगाव गुरव), राजू कथलकर व इतर सर्व संस्थांवरील सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री महारुद्र मारूती संस्थान श्री क्षेत्र जहांगीरपूर येथे ५ ते १२ जूनपर्यंत अधिकमास पर्वावर संगीयमय श्रीमद् भागवत सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा झाला. ८ जूनला कृष्णजन्म पर्वावर या श्रीमद् भागवत कथेचे मुख्य यजमान मनोज गोपालदास चांडक व आशा मनोज चांडक यांनी त्यांचे वडील स्व. गोपालदास चांडक आई स्व. पुष्पा चांडक, भाऊ स्व. मनमोहन चांडक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भागवत कथेचे आयोजन केले होते. युवा कीर्तनकार सु.श्री. भूमिका रवींद्र तिरमारे (मिर्चापूर तरोडा) यांच्या अमृतवाणीतून चौथ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे प्रगटीकरण (जन्म) त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. भगवान श्री कृष्णाच्या दिव्य स्वरुपाच्या रुपात त्रिवांश चांडक होते. श्री. महारुद्ध मारुती संस्थानमध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माचा हजारो भाविकांनी आनंद घेतला. याप्रसंगी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर