ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

प्रा. किरण शुक्ला यांना वाणिज्य व व्यवस्थापन शाखेत आचार्य पदवी:शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून होतोय कौतुकाचा वर्षाव‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिद्द, चिकाटी आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळाच्या जोरावर संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत सवना येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री विठ्ठल रुक्मिणी महाविद्यालय सवना, मधील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या प्राध्यापिका प्रा. किरण आशिष शुक्ला यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत वाणिज्य व व्यवस्थापन शाखेत नुकतीच आचार्य पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे. ‘पश्चिम विदर्भातील शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये कार्यरत विवाहित महिलांच्या कार्यजीवन संतुलनावर परिणाम करणाऱ्या सामाजिक-आर्थिक घटकांचा तुलनात्मक अभ्यास’ हा त्यांचा संशोधन विषय असून त्यांनी हा प्रबंध प्रा. डॉ. भास्कर पाढेन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. विवाहित महिलांच्या कार्यजीवनातील ताणतणाव, सामाजिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती यांचा सखोल अभ्यास या संशोधनातून करण्यात आला आहे. प्रा. शुक्ला यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन निबंध सादर करून त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीची छाप पाडली आहे. समाजोपयोगी विषयांवर भविष्यातही संशोधन व कार्य करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथील वाणिज्य विभागातून आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या त्या प्रथम विद्यार्थिनी ठरल्या आहेत. हे संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी प्राचार्य डॉ. पी. वावरे, उपप्राचार्य व संशोधन केंद्रप्रमुख डॉ. संजय भोयर, वाणिज्य व व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. भूषण मनगटे, प्रा. पी. देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थाचे माजी अध्यक्ष विजय पाटील चोंढीकर, श्री शिवाजी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, अश्विनी पाटील, सुभाष देशमुख, शिवाजीराव देशमुख यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप जयस्वाल, माजी प्राचार्य डॉ. हेमंत महल्ले, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर