ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

महागाई त्वरीत कमी करा; नाहीतर खुर्ची खाली करा:बहुजन मुक्ती पार्टीतर्फे ‘चुल्हा जलाओ’ एल्गार‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्र सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात बहुजन मुक्ति पार्टीच्या वतीने बुधवार दि. २० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “चुल्हा जलाओ” आंदोलन केले. देशातील ६२५ जिल्ह्यांत सुरू असलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असून, वाढती महागाई, स्मार्ट मीटर, गॅस टंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला.या आंदोलनात महिलांनी लाकडाच्या मोळ्या आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून स्वयंपाक केला. “आज गॅस महाग झाला, उद्या गॅस मिळणंच बंद झालं तर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येईल,” असा इशारा महिलांनी सरकारला दिला. आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटरला “जनतेची आर्थिक लूट करणारे साधन” म्हणत तीव्र निषेध नोंदवला. स्मार्ट मीटरमुळे वाढते वीज बिल, वीजपुरवठा नसतानाही येणारी बिले, खासगी कंपन्यांची मनमानी आणि बेरोजगारी याविरोधात सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने तात्काळ स्मार्ट मीटर बंद करून पारदर्शक मीटर बसवावेत, घरगुती गॅस ४०० रुपयांत, कॉमर्शियल गॅस ७०० रुपयांत, पेट्रोल ९० रुपये आणि डिझेल ८० रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनाचे वेळी यवतमाळ-वाशीम बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी केले. या वेळी ज्योती शामकुंवर, अशोक भोयर, भुवन मुनेश्वर, सुनिल गवई, प्रशांत मुनेश्वर, अॅड. रोशना आडे, विलास भोयर, गजानन गोडवे, करन खंडारे, मिलिंद बडशे, शुभांगी मेश्राम, प्रिती गवई, वैशाली मेश्राम, वनिता मेश्राम, आरती मुधाने, लिना मेश्राम, ज्योती कांबळे, शीला भोवते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर