ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

खाकीचा बनावट रुबाब दाखवून 52 हजारांना गंडा:एअर इंडियात नोकरीचे आमिष देत युवकांची केली फसवणूक‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


स्वतः पोलिस दलात कार्यरत असल्याची खोटी बतावणी करून आणि “एअर इंडिया’ कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन सुशिक्षित तरुणांना ५२ हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार आर्णी तालुक्यात उघडकीस आला आहे. आरोपीने चक्क दिल्ली विमानतळाच्या नावाचे बनावट नियुक्तीपत्र पाठवून कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता. मात्र, शहानिशा अंती फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर आर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्णी तालुक्यातील रहिवासी भीमराव राठोड (वय ४६) यांच्या घरी रामनवमी २०२५ च्या सुमारास मुलीच्या लग्नाचे स्थळ घेऊन संतोष जाधव (वय ३०, रा. आपेगाव, पैठण, जि. औरंगाबाद) हा तरुण आला होता. घरामध्ये बोलणी सुरू असताना संतोषने आपण पोलिस दलात कर्मचारी असल्याची खोटी ओळख दिली. गोड बोलून त्याने राठोड कुटुंबाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपी संतोष जाधव याने फिर्यादी भीमराव राठोड यांच्या जावयाला आणि { उर्वरित पान ४ तोतया पोलिसांनी विद्यार्थ्यांना फसवलेली ही एआयने बनवलेली इमेज . अशी उघड झाली फसवणूक काही दिवसांनंतर कुटुंबाने त्या नियुक्तीपत्राची कायदेशीर आणि अधिकृत पातळीवर शहानिशा केली असता, ते पत्र पूर्णपणे बनावट (फेक) असल्याचे उघड झाले. धक्का बसलेल्या राठोड यांनी तातडीने संतोष जाधव याच्याशी संपर्क साधला, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर तो प्रत्यक्षात कुठेही पोलिस कर्मचारी नसल्याचेही समोर आले. भीमराव राठोड यांनी जावयासह आर्णी पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी संतोष गोविंद जाधव विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्णी पोलिस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर