ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

डिझेलसाठी कलेक्टरची परवानगी आणा, पंपचालकांकडून अडवणूक:शेतकऱ्यांनी दिली गोरसेनाला हाक, पदाधिकारी धावले मदतीला‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पुसद तालुक्यात शेतकऱ्यांसमोर डिझेलचे मोठे संकट उभे राहिले आहे. ट्रॅक्टरसाठी व कॅनमध्ये डिझेल मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना पेट्रोल पंपचालक जिल्हाधिकारी परवानगी घेऊन पत्र आणा, तरच डिझेल देऊ असे सांगून परत पाठवत आहेत. त्यामुळे नांगरणी, वखरणीची कामे ठप्प झाली असून, संतप्त शेतकऱ्यांनी गोरसेना पश्चिम यवतमाळचे जिल्हाध्यक्ष जय राठोड यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शेतकरी नेते मनीष जाधव यांनी सुद्धा सोबत दि.२२ मे रोजी दिलेल्या निवेदन देऊन प्रशासनाला धारेवर धरले आहे. या प्रकरणी जय राठोड, मनीष जाधव यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोन दिवसात लेखी आदेश काढण्याची मागणी केली आहे. शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल नाकारणे म्हणजे शेती बुडवण्याचा डाव आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार शेतीसाठी डिझेल नाकारता येत नाही. तरीही पंपचालक मनमानी करत आहेत. हा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ आहे. शेतकरी नेते मनीष जाधव म्हणाले, यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. डिझेल न मिळाल्याने जर पेरणी लांबली तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल. पंप वाले “कलेक्टरची परवानगी’ या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत, असा कोणताही जीआर नाही. हा निव्वळ शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्येला जबाबदार कोण? वेळेवर नांगरणी-वखरणी झाली नाही तर पेरणी लांबणीवर पडेल. उत्पादन घटेल आणि शेतकरी कर्जाच्या खाईत जाईल. डिझेल न मिळाल्याने जर एखाद्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले तर त्याला प्रशासन व हे पंपचालक जबाबदार राहतील, असा संतप्त सवाल दोन्ही संघटनेने उपस्थित केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर