ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

अवैध कत्तलखान्यावर छापा; मांस जप्त, 16 गोवंशाची सुटका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अवैधरित्या गोवंशाची कत्तल करुन त्याचे मांस विक्री करणाऱ्या एका कत्तलखान्यासह मांस विक्री करणाऱ्या शहरातील इस्लामपुरा परिसरातील ७ दुकानांवर पोलिसांनी बुधवारी २० मे रोजी एकाच वेळी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत गोवंशाचे मास जप्त करण्यात आले असून १६ गोवंशाची सुटका करण्यात आली आहे. शहरातील इस्लामपुरा परिसरात जनावरांचा कत्तल खाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख सतीश चावरे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने कत्तल खाण्यावर थेट धड टाकली असता या ठिकाणी काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. सोबतच १६ गोवंश या कत्तलखान्यात आढळुन आले. ७ मांस विक्रीच्या दुकानात तपासणी करण्यात आली असता या दुकानात गोवंशाचे मांस आढळून आले. गुन्हे शाखेने चार, तर शहर डीबी पथकाने तीन दुकानावर कारवाई केली. रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात अकबर गुलाब कुरेशी, मुमताज अहमद मुनाफ कुरेशी, शफिक कुरेशी मेहमुद कुरेशी, अब्दूल नौशाद अब्दूल हाफिज कुरेशी, असे एका गुन्ह्यातील, तर अब्दुल आरीफ शेख कादर कुरेशी, अब्दुल आसिफ अब्दुल कादर कुरेशी, अब्दुल सादिक अब्दुल कादर कुरेशी, असे दुसर्‍या घटनेतील आरोपींचा समावेश आहे. गोवंशाचे चामडे, चरबी आढळली या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान पोलिस पथकाने १६ गोवंश सुटका केली. यासोबतच कत्तलखान्यात कापलेल्या गोवंशाचे वाळलेले चामडे, चरबीने भरलेले डबे, गोवंशाला बांधायचे दावे आणि इतर आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. या घटनेची माहिती दिल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाचे पथकही तेथे दाखल झाले होते. मांस विक्रीच्या दुकानांमध्ये कारवाई झाल्याची माहिती मिळताच कत्तलखाना बंद करुन तेथील आरोपींनी पळ काढला होता. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर