ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

सौजना वाळू घाटावर जिल्हाधिकाऱ्यांची धाड

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बाभुळगाव तालुक्यात सौजना वाळू घाटाचा लिलाव झाला नसतानाही त्या घाटातून उपसा करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी विकास मिना यांनी शुक्रवारी १८ जूनला सौजना वाळू घाटनावर धडक दिली. या वेळी त्यांच्या कारवाईची चाहुल लागल्याने तस्करांनी वाळूघाटावरुन पोबारा केला होता. त्यामुळे एक ट्रक जिल्हाधिकारी यांच्या हाती आला . जिल्ह्यात लिलाव केलेल्या वाळू घाटांची मुदत संपल्याने १० जूनपासून वाळू घाट बंदचे आदेश दिले आहे, असे असताना पाऊस लांबणीवर पडल्याने वाळू तस्कर उपसा करत आहे. त्यात पावसाअभावी कोरड्या नदीपात्रातून नव्हे तर कमी पाणी असलेल्या नदीपात्रात ट्रेझर बोट उतरवून वाळूचा उपसा करण्यात येत आहे. पावसाळ्यात मागणीनुसार वाळू देता यावी, यासाठी तस्करांनी वाळूचे साठे करण्यास सुरूवात केली. यासाठी जिल्ह्यात वाळू तस्करांवर कारवाईच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यातच बाभूळगाव तालुक्यातील सौजना हा वाळूघाट लिलाव न होताही वाळू तस्करांनी पोखरला. यासंदर्भात माहिती होताच जिल्हाधिकाऱ्यांनी येथे कारवाई केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांची कानउघडणी करीत हा प्रकार थांबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही तस्करी सुरूच असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी सौजना वाळू घाटावर धडक दिली. मात्र त्यांच्या वाहनाची चाहुल लागताच तस्करांनी पोबारा केला. या वेळी वाळूचा ट्रक ताब्यात घेतला. ट्रेझर बोट गेली दुसऱ्या किनाऱ्याला जिल्हाधिकारी सौजना वाळू घाटावर पोहोचले त्यावेळी त्या ठिकाणी ट्रेझर बोटीतून वाळू उपसा करण्यात येत होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन दिसताच ही ट्रेझर बोट तस्करांनी नदी पात्रातून नदीच्या दुसऱ्या कडेला वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत नेली. त्याचे चित्रीकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकाने केले. त्यामुळे सौजना वाळूघाटावर सुरू असलेला वाळू उपसा अधोरेखीत झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर