ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पुसदला सहारा पार्कमधून दोन आरोपींना अटक:दोन गटांतील वादाचे हाणामारीत रुपांतर हाेऊन गोळीबार झाला, वसंत नगर पोलिसांची कारवाई‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दोन गटांत झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर होवून त्यात चाकू हल्ला करण्यासह गोळीबार केला. होता. मंगळवारी शहरात घडलेल्या या प्रकरणातील आरोपींच्या शोधातील पोलिस पथकांनी सहारा पार्क परिसरात सापळा रचून दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई बुधवारी २४ जूनला पहाटे ५ वाजताच्या सुमारास केली. अब्दुल वाजिद अब्दुल राऊफ वय ४० वर्षे व अब्दुल राजीक अब्दुल राऊफ वय ३३ वर्षे दोन्हीही रा. रहेमत नगर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यानंतरही आणखी काहीजण फरार आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार वसंत नगर पोलिस ठाण्यामध्ये बुधवारी २४ जून रोजी वजाहत अली खान उर्फ अंजूम खान लियाकत अली खान यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून अब्दुल वाजीद अब्दुल राऊफ व अब्दुल राजीक अब्दुल राऊफ व शेख फहिम शेख करीम या तिघांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या शोध मोहीम दरम्यान अब्दुल वाजिद व अब्दुल राजीक हे सहारा पार्क गार्डन वसंत नगर येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोघांनाही अटक केले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर चहाच्या टपरीवर सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली होती. एका गटाकडून गावठी पिस्तूलने फायरिंग झाली होती.या घटनेनंतर पोलिस पथकांनी तपासणी सुरू केली होती. या गुन्ह्यातील एक आरोपी अजूनही मोकाट असून, पथक त्याचा शोध घेत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर