ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पेरणीसाठी दमदार पावसाची गरज; शेतकरी बांधव प्रतिक्षेत:अधूनमधून पावसाची हजेरी, मात्र पेरणीसाठी ओल नाही‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने अधूनमधून हजेरी लावली असली तरी अद्याप पेरणीयोग्य दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. सर्वत्र समाधानकारक पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक राहिल्याने जमिनी मोठ्या प्रमाणात तापल्या आहेत. मागील काही दिवसांत पाऊस पडूनही जमिनीच्या आतपर्यंत आवश्यक ओल पोहोचलेली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पेरणीचा निर्णय घेतलेला नाही. एक-दोन वेळा झालेल्या पावसामुळे वरवर ओल निर्माण झाली असली, तरी पेरणीसाठी आवश्यक वातावरण तयार झालेले नाही. यंदा अवकाळी पावसाने तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात चांगली हजेरी लावली होती. काही ठिकाणी नाल्यांनाही पाणी आले होते. मात्र त्याचवेळी कडक उन्हाचा तडाखा कायम राहिल्याने पडलेले पावसाचे पाणी लवकर आटून गेले. पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतरही हीच परिस्थिती कायम असून, पडणाऱ्या पावसाचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपासून पाऊस अधूनमधून पडत असला तरी तो समाधानकारक नसल्याने बहुतांश शेतकरी अजूनही पेरणीपासून दूर आहेत. काही शेतकऱ्यांनी टोबणी पेरणी केली असली तरी त्यांच्याही मनात चिंता वाढली आहे. कारण उगवलेल्या बियांना पुढील काही दिवसांत पुरेसा पाऊस न मिळाल्यास तीव्र उष्णतेमुळे रोपे करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या भरोशावर काही शेतकऱ्यांनी टोबणी पेरणी केली होती. त्या बिया आता अंकुरित होऊ लागल्या आहेत. मात्र पुढील चार-पाच दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर तीव्र तापमानामुळे ही कोवळी रोपे वाचवणे कठीण होईल. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर