ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा संदेश

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

संजय खाडे यांच्या पुढाकारातून रक्तदान, वृद्धाश्रमात साहित्य वाटप व व्यावसायिक कार्यालय उद्घाटन

वणी | प्रतिनिधी

वणी: शेतकरी व कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. 23 मे रोजी वणी शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, समाजसेवा आणि विकासाचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमांमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळी 10.30 वाजता शेतकरी मंदिर, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा सामाजिक संदेश देत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अपघात, शस्त्रक्रिया व विविध आजारांमुळे रक्ताची गरज सातत्याने भासत असताना एका रक्तदात्यामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते, या उदात्त भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.दुपारच्या सत्रात वणी येथील वृद्धाश्रमात गरजूंना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून मानवतेचा संदेश दिला जाणार आहे.दरम्यान, संध्याकाळी 6 वाजता शहरात डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स या नव्या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके राहणार आहेत.

संजय खाडे यांचे चिरंजीव धनंजय खाडे यांच्या नेतृत्वात सुरू होणारा हा व्यावसायिक उपक्रम विकासाभिमुख कामांना चालना देणारा ठरणार असल्याची चर्चा शहरात आहे.या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था तसेच संजय खाडे मित्रपरिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत. सामाजिक जाणिवा जपत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर