ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

पुण्यात भरधाव मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू:एनडीए रस्ता, संगमवाडी परिसरात दोन अपघात

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. एनडीए रस्ता आणि संगमवाडी परिसरात या घटना घडल्या. भरधाव मोटारींच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणांचा बळी गेला असून, दोन्ही प्रकरणांमध्ये मोटारचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एनडीए रस्त्यावर घडलेल्या पहिल्या घटनेत, राजू नारायण चव्हाण (वय 31, रा. कोंढवे-धावडे, एनडीए रस्ता) या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. कामावरून घरी परतत असताना, उत्तमनगर परिसरात भरधाव मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात चव्हाण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात ते रस्त्यावर पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी रित्या मृत्यू झाला. या प्रकरणी चव्हाण यांची पत्नी पूनम (वय 27) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अनोळखी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तमनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एन. मिसाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत, संगमवाडी परिसरात ऑनलाइन खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या प्रेमनाथ रामकृष्ण वानखेडे (वय 52, रा. दापोडी) या दुचाकीस्वार कामगाराचा मृत्यू झाला. खासगी आराम बस थांब्याजवळ भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वानखेडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. वानखेडे यांचा मुलगा करण (वय 30) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, एका महिला मोटारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. काळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर