ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

शेतधुरे जाळण्याच्या नादात सरकारी झाडे खाक:गुन्हे दाखलची मागणी, पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत दिले कारवाईसाठी निवेदन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील ग्रामीण रस्त्यालगत असलेल्या नैसर्गिक व वृक्षारोपण केलेल्या मौल्यवान सरकारी झाडांना आग लावून नष्ट करण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. उन्हाळ्यात बाळापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये शेतकरी शेतधुरे जाळत असताना, लगतची सरकारी झाडेही पेट घेत आहेत. काही ठिकाणी जाणीवपूर्वक झाडे पेटवली जात असल्याचा आरोप करत अनंतराव फाटे, जयश्री फाटे, अनिल गावंडे आणि गजानन थोरात या पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केला आहे. झाडे ही केवळ सावली देत नाहीत, तर ती जमिनीची धूप रोखतात आणि उन्हाळ्यात तापमानाचा पारा नियंत्रित ठेवतात. आगीमुळे अनेक पक्ष्यांची घरटी आणि जैवविविधता नष्ट होत आहे.नोटीस न देता, महसूल व वन विभागाने संयुक्त पंचनामे करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, तसेच तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर