ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

मुलांना शिक्षित तर कराच पण सोबत सुसंस्कारीतही करा-पंकज पोहोकर:लोहारा येथील कमलेश्वर मंदिरात अधिक महिन्यानिमित्त शिवपुराण कथा महोत्सव

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | यवतमाळ आजचा काळ हा दक्ष राहण्याचा काळ आहे. विज्ञान युगात प्रत्येकाने दक्ष राहायला हवे. आपल्या मुलांना शिक्षित तर कराच पण सोबत सुसंस्कारीतही करा. यामुळे चांगल्या संस्कारातून उत्तम समाज घडेल, असे प्रतिपादन पंकज महाराज पोहोकर यांनी केले. अधिक मासानिमित्ताने आयोजित शिवपुराण कथा सप्ताहात ते बोलत होेते. लोहारा येथील कमलेश्वर मंदिरात शिवपुराण कथा पर्वाचे आयोजन केले आहे.१८ ते २५ मे या कालावधीत शिवपुराण कथा पर्व होत आहे. सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत शिवपुराण कथा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दक्षराजाच्या यज्ञ प्रसंगातील देवी सतीची कथेचे त्यांनी वाचन केले. यावेळी भगवान शिव, देवी सती आणि दक्ष राजाची पौराणिक कथा वाचन करताना आजच्या काळातही अहंकार न करता प्रत्येकाने दक्ष कसे राहायला हवे. याबाबत ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले, आपल्या दैवाचा विधाता आपणच आहे. आणि जीवनात मान मिळवायचा असेल तर अपमान अपमान सहन करता आला पाहिजे. तरच सर्वसंकटांवर मात करता येते. अलिकडच्या काळात वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. मुलांवर जर चांगले संस्कार असतील तर चांगल्या विचाराची समाजात पेरणी होईल. वृद्धाश्रमाची आवश्यकताच पडणार नाही. असे ते म्हणाले. यावेळी दक्ष राजाच्या काळातील संपूर्ण प्रसंग नाटक रूपात भक्तांनी सादर केला. शिवपुराण कथेच्या श्रवणासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष सदाशिव बेहरे, सचिव संजय चिद्दरवार, उपाध्यक्ष डॉ. आनंद भुसारी, दुर्गा यादव, अजय यादव, उमेश यादव, प्रकाश कनोई, बजरंगप्रसाद दुबे, बंडू कुंडलवार, संतोष डोईजड, सुरेश तिरसिंगे, संजय उपासने, राजू चोरे, सहदेव पाली, संजय भैर, भास्कर केळापुरे यांच्यासह भक्तांकडून परिश्रम घेतले जात आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर